मुंबई : उन्हाळ््यातील सुट्टीत प्रवाशांना कमी गर्दीचा प्रवास करता यावा, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई ते चेन्नई आणि मुंबई ते शालीमारसाठी ४४ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.प्रवाशांच्या सोईसाठी मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पुरातची थलाईवर डॉ.एम. जी. रामचंद्रन सेंट्रल रेल्वे या साप्ताहिक विशेष गाडीच्या २२ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०१०६३ साप्ताहिक विशेष गाडी सीएसएमटीहून १७ एप्रिल ते २६ जूनपर्यंत प्रत्येक बुधवारी सकाळी ११ वाजून ३ मिनिटांनी सुटेल. ही लोकल दुसºया दिवशी दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी पुरातची थलाईवर डॉ. एम. जी. रामचंद्रन सेंट्रल येथे पोहोचेल. याचप्रमाणे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून शालीमार सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडीच्या २२ फेºया चालविण्यात येतील. गाडी क्रमांक ०२०४१ सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडी २० एप्रिला ते २९ जूनपर्यंत प्रत्येक शनिवारी सकाळी ११.५ वाजता सीएसएमटीहून शालीमारसाठी सुटेल.
मुंबई ते चेन्नई, मुंबई ते शालिमार ४४ विशेष गाड्या; वेळापत्रक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 6:38 AM