Join us

मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा! 'सीएसएमटी' स्टेशनला ग्रीन बिल्डिंग काऊन्सिलचं सुवर्ण प्रमाणपत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 9:34 PM

mumbai chhatrapati shivaji maharaj terminus : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनला एक मोठा पुरस्कार जाहीर झाला आहे.

देशाची राजधानी मुंबईतील सर्वाधिक वर्दळ असणारं अतिशय महत्वाचं रेल्वे स्टेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनला (chhatrapati shivaji maharaj terminus) एक मोठा पुरस्कार जाहीर झाला आहे. सीएसएमटी स्टेशनला ग्रीन स्टेशनचा बहुमान मिळाला आहे, तशी माहिती खुद्द रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटवरुन दिली आहे. (mumbai chhatrapati shivaji maharaj terminus awarded Gold Certification by Indian Green Building Council) 

"महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला भारतीय ग्रीन बिल्डिंग काऊन्सिलने सुवर्ण प्रमाणपत्र प्रदान केलं आहे. या रेल्वे स्थानकाच्या वैशिष्ट्यांमध्ये प्रवाशांसाठी स्मार्ट टेक सुविधा, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अनुकूल सुविधा आणि ऊर्जा बजतीसाठीच्या योग्य उपाययोजनांचा समावेश आहे", असं ट्विट पियुष गोयल यांनी केलं आहे. 

ग्रीन बिल्डिंग म्हणजे नेमकं काय?इमारतीतील स्वच्छता आणि स्वच्छ हवेसोबतच पुरेसा सूर्यप्रकाश पोहोचण महत्वाचं असतं. इमारतीच्या परिसरात पुरेशी झाडं, बाग आणि मोकळी जागा देखील असायला हवी. यात कमी पाणी लागणाऱ्या झाडांचा समावेश असायला हवा. इमारतीत सौरऊर्जेचा वापरावर अधिकाअधिक यंत्रणा कार्यरत असावी या गुणांच्या आधारावर ग्रीन बिल्डिंग ठरवली जाते.  

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमुंबईपीयुष गोयलरेल्वेमध्य रेल्वे