Join us

Mumbai: ‘मुंबई मेट्रो २ ब’चे शेवटचे स्टेशन चिता कॅम्प

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 9:28 AM

Mumbai: मुंबई मेट्रो रेल्वे मार्ग-२ ब (डीए ननगर ते मंडाळे) मार्ग आता चिता कॅम्पपर्यंत विस्तारित करण्यात आला आहे. मेट्रो प्राधिकरणाच्या प्रस्तावाला नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे.

मुंबई - मुंबईमेट्रो रेल्वे मार्ग-२ ब (डीए ननगर ते मंडाळे) मार्ग आता चिता कॅम्पपर्यंत विस्तारित करण्यात आला आहे. मेट्रो प्राधिकरणाच्या प्रस्तावाला नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे. या ठिकाणी चिता कॅम्प स्थानक उभरण्यात येणार असून यासाठी २०५ कोटींचा खर्च मेट्रोकडून करण्यात येणार आहे.

राज्य शासनाने मुंबई मेट्रो रेल्वे मार्ग-२ ब (डीएन नगर ते मंडाळे) पर्यंत म्हणजे अंधेरीतील डीएननगर, अंधेरी (प.)-वांद्रे (प)-वांद्रे कुर्ला संकुल- कुर्ला-चेंबूर-मानखुर्द-मंडाळेपर्यंत प्रस्तावित आहे. हा एलिव्हेटेड मार्ग आता मंडाळेपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. मुंबई मेट्रो मार्ग-२ ब (डीएन नगर ते मंडाळे) प्रकल्पाची लांबी २२.६४ कि.मी. असून त्यामधील महाराष्ट्र नगर, मंडाळे येथील शेवटच्या स्थानकापासून पुढे एकेरी मार्गिकेद्वारे चिता कॅम्पपर्यंत विस्तार करण्यात येईल. सदरचा विस्तार हा १.०२३ किमी आहे. चिता कॅम्प हा भाग शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या मतदारसंघात येतो. मेट्रोचा विस्तार चिता कॅम्पपर्यंत करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभेची रणनीती आखल्याची चर्चा आहे.

टॅग्स :मेट्रोमुंबई