मुंबई शहरावर हवाई हल्ल्याचा धोका!

By Admin | Published: March 30, 2017 04:43 AM2017-03-30T04:43:48+5:302017-03-30T04:43:48+5:30

मुंबईवर हवाई हल्ला होण्याचा धोका असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून २९ एप्रिलपर्यंत मुंबईत ड्रोन्सवर बंदी

Mumbai city risk of air strikes! | मुंबई शहरावर हवाई हल्ल्याचा धोका!

मुंबई शहरावर हवाई हल्ल्याचा धोका!

googlenewsNext

मुंबई : मुंबईवर हवाई हल्ला होण्याचा धोका असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून २९ एप्रिलपर्यंत मुंबईत ड्रोन्सवर बंदी घालण्यात आली आहे. हवाईमार्गे ड्रोनच्या साहाय्याने किंवा रिमोट कंट्रोल एरियल मिसाइल, पॅराग्लाइडर्स तसेच रिमोट कंट्रोल्ड मायक्रो लाईट एयरक्राफ्टने मुंबईला लक्ष्य केले जाऊ शकते. संभाव्य धोका लक्षात घेता खबरदारी घेत असल्याचे पोलिसांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितले आहे.
आॅपरेशन विभागाच्या पोलीस उपायुक्त अश्विनी सानप - देवधर यांनी ड्रोनबंदीचे आदेश काढले आहेत. मुंबईवर हवाई हल्ल्याच्या शक्यतेमुळे गुप्तचर यंत्रणांसह, दहशतवादविरोधी पथक सज्ज झाले आहे. हा संभाव्य धोका लक्षात घेता संपूर्ण शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांकडून ड्रोनच्या साहाय्याने करण्यात येणाऱ्या ‘सर्व्हेलन्स’ला आदेशातून सूट देण्यात आली आहे. उपरोक्त काळात प्रतिबंधित उपकरणे वापरल्यास संबंधितांवर भादंवि कलम १८८ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 

Web Title: Mumbai city risk of air strikes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.