Join us

मुंबई! मोटरमनच्या अंत्यविधीला सहकारी गेले; मध्य, हार्बर लोकल खोळंबल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 7:21 PM

Mumbai Local Update: तांत्रिक बिघाड आणि साचलेले पाणी वगळता अविरत धावणाऱ्या लोकल एका विचित्र कारणामुळे खोळंबल्या आहेत.

तांत्रिक बिघाड आणि साचलेले पाणी वगळता अविरत धावणाऱ्या लोकल एका विचित्र कारणामुळे खोळंबल्या आहेत. एका मोटरमनचा मृत्यू झाला होता. त्याच्या अंत्यविधीला अन्य मोटरमन आणि रेल्वे कर्मचारी गेल्याने इतर लोकल गाड्या खोळंबल्या आहेत.

यामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेवरील लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून आतापर्यंत ८४ लोकलसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे शनिवारच्या दिवशी कधीही न थांबलेल्या मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. 

रात्रीपर्यंत आणखी लोकल रद्द कराव्या लागण्याची शक्यता असून रद्द लोकलचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारी मुरलीधर शर्मा या मोटरमनने आत्महत्या केली होती. रेल्वेचा रेड सिग्नल त्याने तोडला होता. यामध्ये कारवाई होईल म्हणून त्यान सँडहर्स्ट स्टेशन दरम्यान आत्महत्या केल्याचा दावा सहकाऱ्यांनी केला होता. तर रेल्वेने त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे म्हटले होते. त्याच्या अंत्यविधीला अन्य मोटरमन गेले होते.

या मोटरमनच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी या मोटरमननी आपण आता सिंगल ड्युटी करणार असून डबल ड्युटी करणार नाही असा पवित्रा घेतला आहे. सुमारे दीड दोन तासांपासून लोकल सीएसएमटी स्थानकात थांबलेल्या आहेत. प्रवाशांना अचानकच्या या आंदोलनामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

टॅग्स :मुंबई लोकलमुंबईमध्य रेल्वे