Mumbai: बोटीवर पाकिस्तानी असल्याच्या खोट्या माहितीमुळे गोंधळ, जलराणीच्या तांडेलासह १४ खलाशांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 10:19 PM2023-04-03T22:19:54+5:302023-04-03T22:21:41+5:30

Mumbai: समुद्रात आढळलेल्या जलराणी बोटीवर असलेल्या तांडेल आणि खलाशांनीच दोन पाकिस्तानी असल्याची खोटी माहिती दिल्यामुळे गोंधळ उडाल्याचे समोर आले.

Mumbai: Confusion over false information about Pakistanis on board, case against 14 sailors including Jalrani's Tandel | Mumbai: बोटीवर पाकिस्तानी असल्याच्या खोट्या माहितीमुळे गोंधळ, जलराणीच्या तांडेलासह १४ खलाशांविरुद्ध गुन्हा

Mumbai: बोटीवर पाकिस्तानी असल्याच्या खोट्या माहितीमुळे गोंधळ, जलराणीच्या तांडेलासह १४ खलाशांविरुद्ध गुन्हा

googlenewsNext

मुंबई : समुद्रात आढळलेल्या जलराणी बोटीवर असलेल्या तांडेल आणि खलाशांनीच दोन पाकिस्तानी असल्याची खोटी माहिती दिल्यामुळे गोंधळ उडाल्याचे समोर आले. याप्रकरणी यलोगेट पोलिसांनी बोटीवरील तांडेल आणि १४ खलाशी विरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल रोजी सकाळी ८ ते १० च्या दरम्यान बीपीए प्लॅटफॉर्म जवळ जलरानि या मासेमारी बोटीने ओएनजीसीच्या प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवाना प्रवेश केला. भारतीय नौदलाच्या टी १६ या गस्तनोकेच्या आदेशाचे उल्लंघन केले. तसेच, संबंधितांना ताब्यात घेत चौकशी केली असता खोटी माहिती दिली. तसेच, बोटीचा तांडेल याने बोटीवरील दोन खलाशी भारतीय असूनही पाकिस्तानी आहेत अशी खोटी माहिती देऊन सुरक्षा पथकाची दिशाभूल केली. म्हणून जलरानी या बोटीवरील तांडेल व १४ खलाशीविरुद्ध गुन्हा नोंदवत यलोगेट पोलीस अधिक तपास करत आहे. 

Web Title: Mumbai: Confusion over false information about Pakistanis on board, case against 14 sailors including Jalrani's Tandel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.