मुंबई : समुद्रात आढळलेल्या जलराणी बोटीवर असलेल्या तांडेल आणि खलाशांनीच दोन पाकिस्तानी असल्याची खोटी माहिती दिल्यामुळे गोंधळ उडाल्याचे समोर आले. याप्रकरणी यलोगेट पोलिसांनी बोटीवरील तांडेल आणि १४ खलाशी विरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल रोजी सकाळी ८ ते १० च्या दरम्यान बीपीए प्लॅटफॉर्म जवळ जलरानि या मासेमारी बोटीने ओएनजीसीच्या प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवाना प्रवेश केला. भारतीय नौदलाच्या टी १६ या गस्तनोकेच्या आदेशाचे उल्लंघन केले. तसेच, संबंधितांना ताब्यात घेत चौकशी केली असता खोटी माहिती दिली. तसेच, बोटीचा तांडेल याने बोटीवरील दोन खलाशी भारतीय असूनही पाकिस्तानी आहेत अशी खोटी माहिती देऊन सुरक्षा पथकाची दिशाभूल केली. म्हणून जलरानी या बोटीवरील तांडेल व १४ खलाशीविरुद्ध गुन्हा नोंदवत यलोगेट पोलीस अधिक तपास करत आहे.