Join us

तगड्या पोलीस बंदोबस्तात पवईतील बांधकामे जमीनदोस्त

By जयंत होवाळ | Published: June 07, 2024 7:33 PM

या कारवाईच्या वेळी १५० पोलीस तैनात करण्यात आले होते. तर २५ इंजिनीअर आणि ३०० कामगार उपस्थित होते.

मुंबई : पवईतील अनधिकृत बांधकामावर कारवाईच्या वेळी स्थानिकांकडून झालेल्या दगडफेकीनंतर तगड्या फौजफाट्यासह सर्व बांधकामे   हटवण्याची कार्यवाही अखेर पूर्ण झाली. जवळपास १२ हजार चौरस फुटावरील बांधकामे या कारवाईत हटवण्यात आली. या कारवाईच्या वेळी १५० पोलीस तैनात करण्यात आले होते. तर २५ इंजिनीअर आणि ३०० कामगार उपस्थित होते.

पवईतील वईगाव व मौजे तिरंदाज गाव येथील भूखंडावर सुमारे ५०० इतक्या झोपड्या असलेली ‘लेबर हटमेंट’ तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आली होती. या झोपड्यांवर कारवाई करावी, असे निर्देश राज्य मानव अधिकार आयोगाने महानगरपालिका प्रशासनास दिले होते. या झोपड्यांच्या कब्जेदारांना १ जून रोजी कायदेशीर नोटीसा बजाविण्यात आल्या होत्या. गुरुवारी  पालिकेचे पथक कारवाईसाठी गेले असता स्थाानिक रहिवाशांनी विरोध करत दगडफेक केली. या घटनेत महानगरपालिकेचे ५ इंजिनिअर , ५ मजूर व त्यासोबत १५ पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत.

टॅग्स :मुंबईमुंबई पोलीसमहाराष्ट्र सरकार