Mumbai Corona Updates: मुंबईत कोरोनाचा हाहाकार! आज तब्बल ८ हजार ६४६ रुग्णांची भर, तर १८ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 08:36 PM2021-04-01T20:36:50+5:302021-04-01T20:38:29+5:30

Mumbai Corona Updates: राज्यात कोरोनाचा विस्फोट सुरूच असून मुंबईत गेल्या २४ तासांत वाढलेली कोरोना रुग्णांची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे.

Mumbai Corona Updates 8 646 news patients in last 24 hours and 18 deaths | Mumbai Corona Updates: मुंबईत कोरोनाचा हाहाकार! आज तब्बल ८ हजार ६४६ रुग्णांची भर, तर १८ जणांचा मृत्यू

Mumbai Corona Updates: मुंबईत कोरोनाचा हाहाकार! आज तब्बल ८ हजार ६४६ रुग्णांची भर, तर १८ जणांचा मृत्यू

Next

Mumbai Corona Updates: राज्यात कोरोनाचा विस्फोट सुरूच असून मुंबईत गेल्या २४ तासांत वाढलेली कोरोना रुग्णांची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. मुंबईत आज तब्बल ८ हजार ६४६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. विशेष म्हणजे कालच्या आकडेवारीपेक्षा आज ३ हजार अधिक रुग्ण वाढले आहेत. बुधवारी मुंबईत ५ हजार ३९४ रुग्ण वाढले होते. त्यामुळे दिवसागणिक वाढणारी रुग्णांची आकडेवारी लक्षणीयरित्या वाढत आहे. 

मुंबईत गेल्या २४ तासांत ५ हजार ०३१ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या शहरात ५५ हजार ००५ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण दुपटीचा वेग ४९ दिवसांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत एकूण १८ जणांना कोरोनामुळे जीव गमावावा लागला आहे. 

धोक्याची घंटा! धारावी, माहिम, दादरमध्ये पुन्हा वाढतोय करोना; चिंता वाढवणारी आकडेवारी समोर

मुंबईत आतापर्यंत ३ लाख ५५ हजार ६९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण मुंबईत ८४ टक्के इतकं आहे. 

मुंबईत कडक निर्बंध
मुंबईमध्ये कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा कडक निर्बंध लावले जाणार असल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. मुंबईच्या लोकलमध्ये पुन्हा एकदा अत्यावश्यक सेवा म्हणून कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्याचा आमचा विचार आहे.  हॉटेल ५० टक्के उपस्थितीने चालवले जाणार आहे. तसेच दुकानं आणि बाजारपेठा एक दिवस आड सुरू ठेवणार असल्याचे संकेत देखील किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे. 

Web Title: Mumbai Corona Updates 8 646 news patients in last 24 hours and 18 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.