Join us

Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच, किती रुग्ण वाढले? आणि किती मृत्यू?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 8:49 PM

Mumbai Corona Updates: मुंबईतील एकूण मृत्यूंचा आकडा ११ हजार ५२८ वर पोहोचला आहे. मुंबईत सध्या ११ हजार ७४७ कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहे.

Mumbai Corona Updates: राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी १५ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. यात एकट्या मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ७०९ रुग्णांचा समावेश आहे. तर गेल्या २४ तासांत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ३ लाख ४१ हजार ९९९ वर पोहोचली आहे. तर ३ लाख १७ हजार ८३० जण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. मुंबईतील एकूण मृत्यूंचा आकडा ११ हजार ५२८ वर पोहोचला आहे. मुंबईत सध्या ११ हजार ७४७ कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहे. (Mumbai Corona Updates 13 March 2021)

मुख्यमंत्र्यांनी दिला कडक इशाराराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आहार, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन, शॉपिंग सेंटर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींची आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व हॉटेल चालकांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. "गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून आपण सर्व व्यवहार सुरु केले आणि त्यानंतर सुमारे ४ महिने आपण सर्वांनी एकजुटीने संसर्ग रोखला. पण आता मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि नियम न पाळल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अजूनही परिस्थिती नियंत्रणात असून हॉटेल व उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे, कडक लॉकडाऊन करण्यास भाग पडू नये, हा शेवटचा इशारा आहे", असं मुख्यमंत्र्यांनी बजावलं आहे.  

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामुंबई