Mumbai Corona Updates: 'मुंबईत लॉकडाऊनची गरज नाही, १० दिवसांत रुग्ण कमी होणार'; पालिका आयुक्त चहल यांनी दिला मोठा दिलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 07:56 PM2022-01-07T19:56:32+5:302022-01-07T22:29:03+5:30

Mumbai Corona Updates: राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असताना मुंबई हे रुग्णवाढीचं केंद्रस्थान बनलं आहे. मुंबईत काल आणि आजही दैनंदिन रुग्णवाढ २० हजारांच्यावर पोहोचली आहे.

Mumbai Corona Updates No need for lockdown in Mumbai patients will be reduced in 10 days says Iqbal Singh Chahal | Mumbai Corona Updates: 'मुंबईत लॉकडाऊनची गरज नाही, १० दिवसांत रुग्ण कमी होणार'; पालिका आयुक्त चहल यांनी दिला मोठा दिलासा!

Mumbai Corona Updates: 'मुंबईत लॉकडाऊनची गरज नाही, १० दिवसांत रुग्ण कमी होणार'; पालिका आयुक्त चहल यांनी दिला मोठा दिलासा!

Next

Mumbai Corona Updates: राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असताना मुंबई हे रुग्णवाढीचं केंद्रस्थान बनलं आहे. मुंबईत काल आणि आजही दैनंदिन रुग्णवाढ २० हजारांच्यावर पोहोचली आहे. यातच महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरू झाली होती. मुंबईत दैनंदिन रुग्णवाढ २० हजारांवर पोहोचल्यास लॉकडाऊनचा विचार करावा लागेल असं विधान काही दिवसांपूर्वी चहल यांनी केलं होतं. आता मुंबईत दैनंदिन रुग्णवाढीनं २० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे मुंबईत लॉकडाऊन लागणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. यावर खुद्द इकबाल सिंह चहल यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

मुंबईतील सध्याची रुग्णवाढीची स्थिती पाहाता लॉकडाऊनची गरज नाही, असं आयुक्त चहल यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. "मुंबईत काल २० हजाराच्या वर रुग्णसंख्या होती. त्यापैकी फक्त ११० लोक ऑक्सिजनवर बेडवर आहेत. ११८० लोक रुग्णालयात दाखल आहेत आणि शहरात ३५ हजार बेड्सपैकी ५९९९ बेड्स व्यापलेले आहेत. म्हणजेच जवळपास ८४ टक्के बेड्स रिकामी आहेत. त्यामुळे ऑक्सिजनचा वापर देखील नगण्य आहेत. बेड रिकामी आहेत. त्यामुळ शहरात लॉकडाऊनची गरज नाही", असं चहल यांनी म्हटलं आहे. 

...तर १० दिवसांत लाट ओसरेल 
"मुंबईत १ कोटी ५० लाख लोक आहेत. आपण आतापर्यंत १०८ टक्के लसीकरण केलं आहे. दक्षिण आफ्रिकेत ही लाट पाच आठवड्यात लाट ओसरली होती. आपण आता तिसऱ्या आठवड्यात आहोत आणि आपण आणखी १० दिवस काढले तर मला खात्री आहे की रुग्ण कमी होणार. दोन आठवड्यात लाट ओसरणार आणि हे आपण १०८ टक्के लसीकरणामुळेचे तोंड देऊ शकलो. पण ज्या ठिकाणी लसीकरण कमी आहे तिथं फेब्रुवारी-मार्चमध्ये परिणाम दिसतील", असं इकबाल सिंह चहल म्हणाले.

रुग्णांचा आकडा आता महत्त्वाचा राहिलेला नसल्याचं इकबाल चहल यांनी सांगितलं. "रुग्णांच्या आकड्यापेक्षा आता तुमच्याकडे किती बेड्स शिल्लक आहेत. हॉस्पीटल्सची, ऑक्सिजनच्या वापराची, ऑक्सिजन बेड्सची काय स्थिती आहे हे महत्त्वाचं आहे. रुग्णसंख्या कमी असतानाही जर ऑक्सिजनचा किंवा आयसीयूचा वापर वाढला तर आपण निर्बंधांचा विचार करू, आता आकड्यांवर लॉकडाऊन होऊ शकत नाही, असं चहल म्हणाले. 

Web Title: Mumbai Corona Updates No need for lockdown in Mumbai patients will be reduced in 10 days says Iqbal Singh Chahal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.