Mumbai Corona Updates: मुंबईत आज कोरोना रुग्णांचा आकडा २० हजार पार; एका दिवसात रुग्णसंख्या ५ हजारानं वाढली, लॉकडाऊन होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 08:01 PM2022-01-06T20:01:14+5:302022-01-06T20:14:17+5:30
Mumbai Corona Updates: राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा झपाट्यानं वाढत असताना आज मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येचा आकडा थेट २० हजाराच्या घरात पोहोचला आहे.
Mumbai Corona Updates: राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा झपाट्यानं वाढत असताना आज मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येचा आकडा थेट २० हजाराच्या घरात पोहोचला आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत तब्बल २०,१८१ नवे रुग्ण आढळले असून ४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या ७९,२६० सक्रिय रुग्ण आहेत. एका दिवसात मुंबईतील रुग्णसंख्येचा आकडा ५ हजारांनी वाढल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईचा आजचा पॉझिटिव्हिटी दर तब्बल २९.९० टक्के इतका नोंदविण्यात आला आहे.
मुंबईत बुधवारी तब्बल १५,१६६ नवे कोरोना रुग्ण आढलले होते. आज हाच आकडा थेट २० हजारांच्यावर पोहोचला आहे. मुंबईतील धारावी परिसरातून आज १०७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दादरमध्ये २२३ आणि माहित परिसरातून ३०८ रुग्णांची वाढ झाली आहे.
Mumbai | Positivity rate is at 29.90% today. 20181 samples tested positive out of the 67,000 samples tested: Brihanmumbai Municipal Corporation
— ANI (@ANI) January 6, 2022
मुंबई लॉकडाऊन होणार?
मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या २० हजारांच्या घरात गेल्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असं विधान महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केलं होतं. त्यास महापौर किशोरी पेडणेकर यांनीही दुजोरा दिला होता. आज मुंबईत २० हजाराहून अधिक रुग्ण आढळल्यानं आता शहरात लॉकडाऊन लागणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.