Mumbai Corona Updates: लयभारी! सलग दुसऱ्या दिवशी मुंबईची कोरोना रुग्णसंख्या २ हजाराच्या खाली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 06:47 PM2021-05-11T18:47:21+5:302021-05-11T18:47:50+5:30
Mumbai Corona Updates: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता मुंबईतील कोरोना लढ्याचं कौतुक देशपातळीवर केलं जात आहे. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी दोन हजारापेक्षा कमी रुग्णवाढ झाली आहे.
Mumbai Corona Updates: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता मुंबईतील कोरोना लढ्याचं कौतुक देशपातळीवर केलं जात आहे. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी दोन हजारापेक्षा कमी रुग्णवाढ झाली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत १७१७ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ६ हजार ८२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आज एकूण २८ हजार २५८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, कोरोना रुग्ण बरं होण्याचं प्रमाण आता ९२ टक्क्यांवर पोहोचलं आहे. (mumbai corona updates today total positive patients 1717 and 6082 patients recovered and discharged)
मुंबईत सध्या ४१ हजार १०२ सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा कालावधी १७० दिवसांवर गेला आहे. रुग्णवाढीचं प्रमाण आता ०.३९ टक्के इतकं झालं आहे. मुंबईत सोमवारी देखील नव्या कोरोना रुग्णांचा आकडा दोन हजाराहून कमी नोंदवला गेला होता. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 11, 2021
११ मे, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण - १७१७
२४ तासात बरे झालेले रुग्ण - ६०८२
बरे झालेले एकूण रुग्ण - ६२३०८०
बरे झालेल्या रुग्णांचा दर - ९२%
एकूण सक्रिय रुग्ण- ४११०२
दुप्पटीचा दर- १७० दिवस
कोविड वाढीचा दर (४ मे -१० मे)- ०.३९%#NaToCorona
मुंबईत गेल्या २४ तासांत ५१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतील आतापर्यंतची कोरोना रुग्णांची संख्या ६ लाख ७९ हजार ९८६ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत एकूण ६ लाख २३ हजार ८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.