Mumbai Corona Vaccination: मुंबईकर लसवंत! कोरोना लसीच्या पहिल्या डोसचा एक कोटींचा टप्पा पार 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 07:48 PM2022-01-05T19:48:19+5:302022-01-05T19:48:41+5:30

​​​​​​​कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत महापालिकेने बुधवारी महत्वाचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत १०८ टक्के नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे

Mumbai Corona Vaccination first dose of corona vaccine has crossed the one crore mark | Mumbai Corona Vaccination: मुंबईकर लसवंत! कोरोना लसीच्या पहिल्या डोसचा एक कोटींचा टप्पा पार 

Mumbai Corona Vaccination: मुंबईकर लसवंत! कोरोना लसीच्या पहिल्या डोसचा एक कोटींचा टप्पा पार 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई -

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत महापालिकेने बुधवारी महत्वाचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत १०८ टक्के नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे, यामध्ये मुंबईबाहेरील लोकांचाही समावेश आहे. तर ८८ टक्के लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहे. कोविड लसीचे दोन्ही डोस मिळून एक कोटी ८१ लाखांपेक्षा अधिक लस आतापर्यंत देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय स्तरावरील लसीकरण मोहिमेची वर्षपूर्ती होण्याआधीच विक्रमी वेळेत मुंबईने ही कामगिरी बजावली आहे.

मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्यांदा आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली, त्यानंतर टप्प्याटप्याने फ्रंटलाईन कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ ते ५९ वयोगटातील सहव्याधी असलेले व्यक्ती, ४५ वर्ष वयावरील आणि १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरु करण्यात आले. तर ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे देखील लसीकरण सुरु करण्यात आले आहे. 

असे सुरु राहिले लसीकरण... 
लसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राईव्ह-इन लसीकरण सुरु करण्यात आले. त्यानंतर स्तनदा माता, विदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी अथवा नोकरी, व्यवसायासाठी जाणाऱ्यांकरिता लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. गर्भवती महिला, शासकीय ओळखपत्र नसलेले नागरिक आणि अंथरुणास खिळून असलेल्या रुग्णांचेही लसीकरण केले जात आहे. तसेच दिव्यांग व्यक्ती, कैदी, एलजीबीटी समुदायातील नागरिक इत्यादींसाठी विशेष केंद्र, फक्त महिलांसाठी राखीव विशेष लसीकरण सत्र, शिक्षक आणि १८ वर्ष वयावरील विद्यार्थी यांच्यासाठी राखीव सत्र, फक्त दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी सत्र अशा उपाययोजना महानगरपालिकेने केल्या आहेत. 

पालिकेची लसीकरणात विक्रमी कामगिरी.... 
तारीख .... एकूण लसीकरण 
३१ मे  २०२१ - २५ लाख
१९ जुलै - ५० लाख
१५ सप्टेंबर - ७५ लाख 
५ जानेवारी २०२२ - एक कोटी ८१ लाख 

१८ वर्षांवरील लाभार्थी - ९२ लाख ३६ हजार ५०० 
पहिला डोस - ९९ लाख ८० हजार ६२९ (१०८ टक्के) 
दुसरा डोस - ८१ लाख ३७ हजार ८५० (८८ टक्के)
१५ ते १८ वयोगट लाभार्थी - नऊ लाख २२ हजार 
आतापर्यंत पहिला डोस - १५ हजार ११०

Web Title: Mumbai Corona Vaccination first dose of corona vaccine has crossed the one crore mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.