कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 13:56 IST2025-04-22T13:56:36+5:302025-04-22T13:56:36+5:30
Vikhroli Women Found Dead: मुंबईच्या विक्रोळी परिसरात एका महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळून आला.

कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
मुंबईच्या विक्रोळी परिसरात एका महिलेचा राहत्या घरात मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ माजली. मृत महिलेचा पत्नी रात्रपाळी करून पहाटे घरी परतल्यानंतर त्याला त्याची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली.
सूमन सूरज निर्मल असे मृतावस्थेत आढळलेल्या महिलेचे नाव असून त्या विक्रोळी पूर्व परिसरात राहत होती. सूरज रात्रपाळी करून आज पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास आपल्या घरी परतला, तेव्हा त्याला त्याची पत्नी सुमन रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची दिसली. त्याने लगेच या घटनेची माहिती मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला दिली. या महिलेची हत्या झाल्याची असावी? असा पोलिसांनी संशय व्यक्त केला. मात्र, ही हत्या कुणी आणि कुठल्या कारणावरून केली, याबाबत अद्याप कळू शकलेले नाही. याप्रकरणी विक्रोळी पोलीसांत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.