चेंबूरमध्ये घराच्या मालकी हक्कावरून वृद्ध दाम्पत्यावर हल्ला

By मनीषा म्हात्रे | Published: March 10, 2024 07:46 PM2024-03-10T19:46:26+5:302024-03-10T19:47:21+5:30

Mumbai Crime News: चेंबूरमध्ये घराच्या मालकी हक्कावरून वृद्ध दाम्पत्यावर हातोडी, चॉपरने जीवघेणा  हल्ला चढविल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी मंजु शिवानंद गौडा (५१) याला अटक केली आहे.

Mumbai Crime News: Elderly couple attacked over house ownership in Chembur | चेंबूरमध्ये घराच्या मालकी हक्कावरून वृद्ध दाम्पत्यावर हल्ला

चेंबूरमध्ये घराच्या मालकी हक्कावरून वृद्ध दाम्पत्यावर हल्ला

मुंबई - चेंबूरमध्ये घराच्या मालकी हक्कावरून वृद्ध दाम्पत्यावर हातोडी, चॉपरने जीवघेणा  हल्ला चढविल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी मंजु शिवानंद गौडा (५१) याला अटक केली आहे.

चेंबूर परिसरात राहणाऱ्या ७१ वर्षीय चंद्रा भोरे गौडा यामध्ये गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी मंजु शिवानंद गौडा (५१) याला अटक केली आहे. तो सांताक्रूझ येथील रहिवासी आहे.  शनिवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास चंद्रा हे पत्नी लक्ष्मी यांच्यासोबत घरात झोपले असताना मंजू तेथे आला. त्याने, घराच्या मालकी हक्काच्या वादावरून घराचा दरवाजा हातोडीने तोडून घरात शिरला.

चॉपर व हातोडी घेवून जबरदस्तीने घरात घुसुन चंद्रा  यांना जिवेठार मारण्याची धमकी दिली. तसेच गौडा दाम्पत्याचे सामान जबरदस्तीने घराबाहेर फेकण्यास सुरुवात केली. याला विऱोध करताच, चंद्रा यांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, कपाळावर, दोन्ही हातांना तसेच दोन्ही पायांवर वार करुन गंभीर जखमी केले आहे. त्यांच्या पत्नीवर चॉपरने वार केले. स्थानिकांनी मदतीसाठी पुढाकार घेताच, मंजु गौडा याने बाहेर येऊन हातातील चॉपर फिरवून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. घटनेची वर्दी लागताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आहे. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल केले.  
 

Web Title: Mumbai Crime News: Elderly couple attacked over house ownership in Chembur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.