Mumbai Drug Case: नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर दुबईतून येताहेत फोन कॉल्स, NCB चा धक्कादायक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 05:16 PM2021-11-08T17:16:10+5:302021-11-08T17:17:00+5:30

Mumbai Drug Case: मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणाच्या तपासात आता दुबईची देखील एन्ट्री झाली आहे.

mumbai cruise drugs case updates ncb nawab malik phone tapping dubai call ram kadam bjp | Mumbai Drug Case: नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर दुबईतून येताहेत फोन कॉल्स, NCB चा धक्कादायक आरोप

Mumbai Drug Case: नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर दुबईतून येताहेत फोन कॉल्स, NCB चा धक्कादायक आरोप

Next

Mumbai Drug Case: मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणाच्या तपासात आता दुबईची देखील एन्ट्री झाली आहे. अमलीपदार्थ विरोधी पथकाच्या (NCB) सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांना दुबईहून अज्ञात फोन कॉल्स येत आहेत. "मुंबई ड्रग्ज प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पण याआधी कधीच अधिकाऱ्यांना दुबईहून कोणतेही फोन कॉल्स येत नव्हते. आता अधिकाऱ्यांना अचानक दुबईहून कॉल्स येत आहेत. पण ते उचलेले गेलेले नाहीत", असं एनसीबीच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. 

इतकंच नव्हे, तर एनसीबीच्या अधिकाऱ्यांना फोन टॅपिंगचा संशय देखील आहे. रविवारी नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी व्ही.व्ही.सिंह आणि सॅम डिसोजा यांच्यातील फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप ऐकवली होती. एनसीबीनं यामागे फोन टॅपिंगचा संशय व्यक्त केला आहे. एनसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जून २०२१ मध्ये मुंबई पोलीस सेवेतून निवृत्त एसीपीच्या मुलाच्या विरोधात कारवाई केली गेली होती. याच प्रकरणासाठी व्ही.व्ही.सिंह यांचा फोन टॅप केला जात असल्याचं संशय एनसीबीनं व्यक्त केला आहे. 

नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एनसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवृत्त एसीपींचा सुपुत्र श्रेयस कंजले याच्याकडे एलएसडीचे ४३६ ब्लॉट्स जप्त करण्यात आले होते. याप्रकरणात त्याला अटकही केली गेली होती. यासाठीच एनसीबीच्या अधिकाऱ्यांचं फोन टॅपिंग केलं गेलेलं असू शकतं. दरम्यान, सॅम डिसोजा यानंही संबंधित ऑडिओ क्लीप लीक केल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजपानंही केले फोन टॅपिंगचे आरोप
भाजपानंही राज्य सरकारवर फोन टॅपिंगचे आरोप केले आहेत. भाजपा नेते राम कदम यांनी एका कॅबिनेट मंत्र्याकडे एनसीबी अधिकाऱ्यांच्या फोन संभाषणाची क्लीप नेमकी आली कुठून? असा सवाल उपस्थित केला आहे. एनसीबी अधिकाऱ्यांचं राज्य सरकारकडून जाणीवपूर्वक फोन टॅपिंग तर केलं जात नाहीय ना? असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे. 

Web Title: mumbai cruise drugs case updates ncb nawab malik phone tapping dubai call ram kadam bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.