- नितीन जगतापमुंबई : मुंबई म्हणजे गर्दी हे पक्के समीकरण आहे. कोणत्याही स्टेशनवर उभे राहिल्यास त्याची प्रचीती सहज येते. गर्दीने तुडुंब भरलेला प्लॅटफॉर्म आणि लोकल आली की त्यात स्वत:ला कोंबून घेणारे मुंबईकर, हे दृश्य नवागताला धडकी भरवणारे असते. मात्र, हेच मुंबईचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच मुंबईतील कोणत्या स्थानकात किती गर्दी याची आकडेवारी मध्य रेल्वेतर्फे नियमितपणे प्रसिद्ध होत असते. ऑक्टोबर महिन्यात हा मान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला मिळाला. तब्बल १२ लाख प्रवासी या स्थानकावर या महिन्यात येऊन गेले.
नुकताच फेस्टिव्हल सीझन संपला. या सीझनमध्ये देशभरातून पर्यटक मुंबईला आले. तितक्याच प्रमाणात मुंबईबाहेरही गेले. प्रवाशांना तिकिटासाठी अधिक ताटकळत राहावे लागू नये यासाठी एटीव्हीएमची संख्या वाढवली आहे. तसेच तिकीट खिडक्यांवरील शिफ्ट्सचीही संख्या वाढवली. यंदा सीएसएमटी गर्दीचे स्थानक ठरले. - डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
तिकीट विक्री कमी असलेली पाच स्थानकेनिडी ५० खंडाळा ७२ठाणसीट ७३हमरापूर २३३कासू २५९
मध्य रेल्वेवर सरासरी ७८,११,०४६ तिकीट विक्री मध्य रेल्वेच्या ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारीनुसार मध्य रेल्वेवर ७९,६५,१५१ तिकीट आणि पासची विक्री होते. यामध्ये ७८,११,०४६ प्रवासी यूटीएसचा वापर करतात, तर १५,४,१०५ प्रवासी तिकीट खिडक्यातून तिकीट काढत आहेत. सीएसएमटी स्थानकातून यूटीएसला पसंती सीएसएमटी स्थानकातून ११,९२,१९९ तिकीट आणि पास विक्री होते. यामध्ये ११,४६,४२० प्रवासी यूटीएसचा वापर करतात, तर ४५,७७९ प्रवासी तिकीट खिडक्यातून तिकीट काढत आहेत.