मुंबई-गोवा वंदे भारतचे तिकीट किती असेल? महत्त्वाची माहिती आली समोर; ‘असे’ असतील दर!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 09:19 AM2023-06-21T09:19:56+5:302023-06-21T09:20:53+5:30
Mumbai-Goa Vande Bharat Ticket Rate Fare: २७ जून रोजी मुंबई-गोवा सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन होऊ शकते, असे सांगितले जात आहे. या सेमी हायस्पीड ट्रेनचे तिकीट दर जाणून घ्या...
Mumbai-Goa Vande Bharat Ticket Rate Fare: आताच्या घडीला देशात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली वंदे भारत एक्स्प्रेस आता मुंबई-गोवा मार्गावर सुरू होणार आहे. गोव्याहून सहा तासांत मुंबईला पोहोचवणाऱ्या या ट्रेनची प्रतीक्षा मोठ्या आतुरतेने केली जात आहे. ३ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन करणार होते; परंतु बालासोर ओडिशातील दुर्दैवी रेल्वे अपघातामुळे उद्घाटन लांबणीवर टाकण्यात आले. आता २७ जून रोजी पंतप्रधान मोदी मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस ही आठ डब्यांची असणार आहे. शुक्रवारी ही सेवा शुक्रवारी वंदे भारत एक्स्प्रेसची सेवा असणार नाही, असे सांगितले जात आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही कोकण मार्गावर धावणारी सर्वात जलद एक्सप्रेस असणार आहे. तेजस एक्सप्रेसपेक्षा वंदे भारत ट्रेन मडगावला लवकर पोहोचेल. ही ट्रेन राज्यातील सर्वाधिक लांबीच्या मार्गावर धावणारी पहिली एक्सप्रेस ठरणार आहे. मुंबई ते गोवा ५८६ किमी लांबीचा पल्ला ती सात ते आठ तासांत गाठेल, असे सांगितले जात आहे.
मुंबई-गोवा वंदे भारतचे तिकीट किती असेल?
मुंबई-मडगावदरम्यान धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसचे एसी चेअरकारचे तिकीट ९९० रुपये तर एक्झिक्युटिव्ह व्हिस्टाडोम कोचचे तिकीट २४९५ रुपये एवढे आहे. तर मुंबई-मडगाव तेजस एक्स्प्रेस एसी चेअरकारचे तिकीट दर १६१०, एसी एक्झिक्युटिव्ह कोचचे तिकीट ३१३० आणि एक्झिक्युटिव्ह व्हिस्टाडोम कोचचे तिकीट २९१५ रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-मडगाव मार्गावरील सेमी हायस्पीड ट्रेन असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेस प्रवासासाठी एसी चेअरकारचे तिकीट १४३५ रुपये तर एक्झिक्युटिव्ह कारसाठी २९१५ रुपये एवढे तिकीट दर असू शकतात, असे सांगितले जात आहे. यात बदल होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस कधी सुटणार, कुठे थांबणार? पाहा, संभाव्य वेळापत्रक