Mumbai-Goa Vande Bharat Time Table: मुंबई-गोवा वंदे भारतचं टाइमटेबल आलं; कधी सुटणार, कुठे थांबणार? पाहा, एकाच क्लिकवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 02:35 PM2023-06-01T14:35:24+5:302023-06-01T14:36:11+5:30
Mumbai-Goa Vande Bharat Time Table: मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक समोर आले आहे.
Mumbai-Goa Vande Bharat Time Table: आताच्या घडीला देशात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली वंदे भारत एक्स्प्रेस आता मुंबई-गोवा मार्गावर सुरू करण्यात येत आहे. ०३ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोकण रेल्वेवरील वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यानंतर ०५ जूनपासून वंदे भारत एक्स्प्रेसची नियमित सेवा सुरू होणार आहे. यातच आता वंदे भारत एक्स्प्रेसचे टाइमटेबल समोर आले आहे. मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईतून कधी सुटणार, गोव्यातून परतीचा प्रवास कधी असेल, तिचे थांबे कुठे असतील, जाणून घेऊया...
मुंबईकरांना चौथी वंदे भारत ट्रेन आता मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मडगाव स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर एकवरून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सकाळी साडेदहा वाजता ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. ही वंदे भारत एक्सप्रेस आठवड्याला सहा दिवस चालवण्याचे प्लॅनिंग आहे. शुक्रवारी वंदे भारत एक्स्प्रेसची सेवा असणार नाही, असे सांगितले जात आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही कोकण मार्गावर धावणारी सर्वात जलद एक्सप्रेस असणार आहे. तेजस एक्सप्रेसपेक्षा वंदे भारत ट्रेन मडगावला लवकर पोहोचेल. मुंबई गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आठ डब्यांची असल्याचे सांगितले जात आहे. १६ मे रोजी मुंबई-गोवा कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारतची चाचणी घेण्यात आली होती. ती यशस्वी झाल्यानंतर आता वंदे भारत एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. दरम्यान, वंदे भारतच्या तिकीट दरांबाबत अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही. ((Mumbai-Goa Vande Bharat Station Halts))
मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक
मुंबई ते मडगाव | थांबे आणि वेळ |
CSMT | पहाटे ५ वाजून २५ मिनिटे |
दादर | पहाटे ५ वाजून ३२ मिनिटे |
ठाणे | पहाटे ५ वाजून ५२ मिनिटे |
पनवेल | सकाळी ६ वाजून ३० मिनिटे |
रोहा | सकाळी ७ वाजून ३० मिनिटे |
खेड | सकाळी ८ वाजून २४ मिनिटे |
रत्नागिरी | सकाळी ९ वाजून ४५ मिनिटे |
कणकवली | सकाळी ११ वाजून २० मिनिटे |
थिविम | दुपारी १२ वाजून २८ मिनिटे |
मडगाव | दुपारी ०१ वाजून १५ मिनिटे |
मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक
मडगाव ते मुंबई | थांबे आणि वेळ |
मडगाव | दुपारी ०२ वाजून ३५ मिनिटे |
थिविम | दुपारी ०३ वाजून २० मिनिटे |
कणकवली | दुपारी ०४ वाजून १८ मिनिटे |
रत्नागिरी | सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटे |
खेड | रात्री ०७ वाजून ०८ मिनिटे |
रोहा | रात्री ०८ वाजून २० मिनिटे |
पनवेल | रात्री ९ वाजता |
ठाणे | रात्री ०९ वाजून ३५ मिनिटे |
दादर | रात्री १० वाजून ०५ मिनिटे |
CSMT | रात्री १० वाजून २५ मिनिटे |