Mumbai CST Bridge Collapse : सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 06:31 PM2019-03-15T18:31:36+5:302019-03-15T18:44:33+5:30
याप्रकरणी मुख्य अभियंता ए. आर. पाटील, एस.ओ.कोरी आणि सहाय्यक अभियंता एस.एफ काकुळते यांचे निलंबन करण्यात आले आहे.
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालया पादचारी पूल कोसळल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, याप्रकरणी मुख्य अभियंता ए. आर. पाटील, एस.ओ.कोरी आणि उपमुख्य अभियंता आर. बी. तारे व सहाय्यक अभियंता एस.एफ काकुळते यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच, स्ट्रक्चर ऑडिटचा चुकीचा अहवाल देणारी देसाई कन्सल्टनला काळ्या यादीत टाकले आहे. तर कंत्राटदार आरपीएस कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.
Brihanmumbai Municipal Corporation orders suspension for Executive Engineer AR Patil who supervised the structural audit work in 2017-18 and Assistant Engineer SF Kakulte who supervised the repair work in 2013-14. A full-fledged departmental enquiry be carried out against them.
— ANI (@ANI) March 15, 2019
महापालिकेच्या मुख्यालयापासून जवळच असलेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला झाला असून 30हून अधिक लोक जखमी झाले. जखमींची प्रकृतीही गंभीर आहे. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी रेल्वे आणि महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझाद मैदान पोलिसांत कलम 304 एअंतर्गत हा गुन्हा नोंदवला असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.
BMC Preliminary Report: It's apparent that structural audit report has failed to point out an impending failure. In spite of commissioning the report of bridge & spending public money on it, true condition of bridge was not brought out. The structural report should be made public https://t.co/HbPgxLe5lX
— ANI (@ANI) March 15, 2019
मुख्यमंत्र्यांनीही या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहे. त्यानुसार, याप्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मुख्य अभियंता ए. आर. पाटील, एस.ओ.कोरी आणि उपमुख्य अभियंता आर. बी. तारे व सहाय्यक अभियंता एस.एफ काकुळते यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच, स्ट्रक्चर ऑडिटचा चुकीचा अहवाल देणारी देसाई कन्सल्टनला काळ्या यादीत टाकले आहे. तर कंत्राटदार आरपीएस कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.
BMC Preliminary Report on #CSTBridgeCollapse states "There is a prima facie reason to believe that the structural audit has been conducted an irresponsible and negligent manner. This tragedy could have been avoided if the structural audit had been done diligently." pic.twitter.com/OcEC1GIYr4
— ANI (@ANI) March 15, 2019