मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालया पादचारी पूल कोसळल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून 36 जण जखमी झाले आहेत.
ही गंभीर दुर्घटना घडली असून याचे अतीव दुःख आहे. या पूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट केले होते. त्यामध्ये पूल मजबूत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करणार येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याचबरोबर, दुर्घटनेतील जखमींवर पूर्ण उपचार केले जातील. तसेच, मृतकांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये दिले जातील. तर, जखमींना 50 हजार रुपयांची मदत करण्यात येईल, असेही यावेळी ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालया पादचारी पुलाचा अर्धा भाग आज सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला, तर 36 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमींना सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत अपूर्वा प्रभू, रंजना तांबे आणि झाहीद सिराज खान अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत, तर आणखी दोन व्यक्तींची नावे अद्याप समजू शकलेले नाही आहेत.