मुंबईत काेराेना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:24 AM2020-12-13T04:24:45+5:302020-12-13T04:24:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत काेराेना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्क्यांवर पोहोचले असून, रुग्ण दुपटीचा कालावधी ३१२ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत काेराेना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्क्यांवर पोहोचले असून, रुग्ण दुपटीचा कालावधी ३१२ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या १२,५२० सक्रिय रुग्ण आहेत. शनिवारी काेराेनाच्या ६८० रुग्णांचे निदान झाले असून १० मृत्यू झाले. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या २ लाख ९० हजार २३ झाली असून बळींचा आकडा १० हजार ९६९ एवढा आहे. दिवसभरात ४७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर, आतापर्यंत २ लाख ६५ हजार ७६० रुग्णांनी कोरोनावर मात केली.
शहर - उपनगरात चाळ व झोपडपट्टीच्या वस्तीत ४३६ सक्रिय कंटेनमेंट झोन्स आहेत, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ४ हजार ८६६ आहे. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील ३ हजार १७९ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.
..................