कशासाठी? मुंबईकरांच्या पोटासाठी, जोरदार पावसातही मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2018 03:45 PM2018-06-09T15:45:19+5:302018-06-09T15:45:19+5:30
मुंबईमध्ये मान्सूनचे जोरदार आगमन झाले आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्गासह राज्याच्या विविध भागांमध्ये शनिवारी (9 जून) पहाटे पासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली.
मुंबई - मुंबईमध्ये मान्सूनचे जोरदार आगमन झाले आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्गासह राज्याच्या विविध भागांमध्ये शनिवारी (9 जून) पहाटे पासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे दक्षिण मुंबईतील हिंदमाता, किंग्ज सर्कलसह सायन, चुनाभट्टी आणि सायन परिसरात ठिकठिकाणी पाणी तुंबले आहे. यामुळे परिसरातील वाहतूक मंदावली आहे. अशा परिस्थितीही मुंबईतील डबेवाल्यांनी आपल्या सेवेमध्ये खंड पडू दिलेला नाही. पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचलेले असतानाही डबेवाले पाण्यातून वाट काढत आपली डब्यांची सेवा मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
ऊन, वारा, जोरदार पाऊस जरी असला तरी मुंबईचा डबेवाला मात्र आपली डबे पोहोचवण्याची सेवा देण्यासाठी जीवाचा आटापिटा करत असतो. कोणत्याही परिस्थितीत मुंबईकर नागरिक उपाशी राहू नये या उद्देशानं डबेवाले रोहिदास सावंत यांच्यासहीत अन्य डबेवाल्यांनीही आजही आपल्या सेवेत खंड पडू दिलेला नाही.
The southwest monsoon reaches Mumbai on June 9, one day before the anticipated date of June 10. Heavy rainfall is expected till June 11: India Meteorological Department #Maharashtra
— ANI (@ANI) June 9, 2018