दिल्ली, मुंबईला गांजाचा विळखा!;जगातील ‘टॉप टेन’ शहरांत समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 01:24 AM2018-10-08T01:24:42+5:302018-10-08T01:25:12+5:30

सर्वाधिक गांजाचा खप असलेल्या जगातील ‘टॉप टेन’ शहरांमध्ये देशाची राजधानी आणि आर्थिक राजधानीचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या अहवालानुसार, नवी दिल्लीला तिसरा आणि मुंबईला सहावा क्रमांक देण्यात आला आहे.

Mumbai, Delhi in hemp, In the top 10 cities of the world | दिल्ली, मुंबईला गांजाचा विळखा!;जगातील ‘टॉप टेन’ शहरांत समावेश

दिल्ली, मुंबईला गांजाचा विळखा!;जगातील ‘टॉप टेन’ शहरांत समावेश

Next

- महेश चेमटे

मुंबई : सर्वाधिक गांजाचा खप असलेल्या जगातील ‘टॉप टेन’ शहरांमध्ये देशाची राजधानी आणि आर्थिक राजधानीचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या अहवालानुसार, नवी दिल्लीला तिसरा आणि मुंबईला सहावा क्रमांक देण्यात आला आहे. विशेष म्हणजे ३०० ते ३२४ रुपये प्रतिग्रॅम या दराने देशाच्या राजधानीत उपलब्ध असलेल्या गांजाला जोरदार मागणी आहे.
शहरातील ‘रेव्ह’ पार्टी, महाविद्यालतील ‘डे-उत्सव’ यांसारख्या ठिकाणी अमली पदार्थ सहज उपलब्ध होतात. १०० रुपयांपर्यंत उपलब्ध होणारी ‘पुडी’ विद्यार्थ्यांच्या खिशाला परवडणारी असल्यामुळे तरुणाई व्यसनाधीनतेच्या जाळ्यात अडकत आहे.
अभ्यास अहवालानुसार, जगातील गांजाचा सर्वाधिक खप असलेल्या शहरांमध्ये मुंबई आणि दिल्लीचा समावेश आहे. मुंबईत वर्षाला ३२.३८ मेट्रिक टन आणि दिल्लीत ३८.२६ मेट्रिक टनचा खप होतो. मुंबईत प्रतिग्रॅमसाठी ४.५७ यूएस डॉलर (भारतीय मूल्य - ३३८.४८) मोजावे लागतात. तर दिल्लीत प्रतिग्रॅमसाठी ४.३८ यूएस डॉलर अर्थात भारतीय मूल्यामध्ये ३२४.४० रुपये मोजावे लागत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यूएसएमधील न्यूयॉर्क शहर गांजा खपासाठी जगातील पहिल्या क्रमांकाचे शहर असून, येथे तब्बल ७७.४४ मेट्रिक टन गांजाचा खप वर्षभरात होतो. न्यूयॉर्कमध्ये प्रतिग्रॅमसाठी १०.७६ यूएस डॉलर (भारतीय मूल्य- ७९६.९४ रुपये) मोजावे लागत आहेत.
१९८५ च्या नार्कोटिक ड्रग्स अ‍ॅण्ड सायकोट्रॉफिक सबस्टन्सेस अ‍ॅक्टनुसार (मादक द्र्रव्ये आणि मनोवैज्ञानिक पदार्थ कायदा) गांजावर बंदी आहे. खसखशीच्या झाडापासून, गांजासोबतच चरस आणि अफू बनवण्यात येते. गांजाला उग्र वास असल्याने हे त्वरित समजते. ‘जगात तरुण देश’ अशी भारताची ओळख आहे. मात्र कमी किंमत, सहज उपलब्धता यांमुळे महाविद्यालयातील तरुणांपासून ते आयटीमधील इंजिनीअरदेखील गांजाच्या नशेत झिंगताना दिसतात. त्यामुळे अमली पदार्थ खरेदी-विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

गांजाचा सर्वाधिक खप असलेली शहरे

शहरे मूल्य प्रतिग्रॅम खप
(यूएस डॉलर-भारतीय रुपये) (मेट्रिक टन)
न्यूयॉर्क १०.७६ -७९६.९४ ७७.४४
कराची ५.३२-३९४.३ ४१.९५
नवी दिल्ली ४.३८-३२४.४ ३८.२६
लॉस एंजिलिस ८.१४-६०२.८९ ३६.०६
कैरो १६.१५-११९६.१५ ३२.५९
मुंबई ४.५७-३३८.४८ ३२.३८
लंडन ९.२-६८१.४ ३१.४
शिकागो ११.४६-८४८.७८ २४.५४
मॉस्को ११.८४-८७६.९३ २२.८७
टोरंटो ७.८२-५७९.१९ २२.७५
टिप - १ डॉलरचे भारतीय मूल्य ७४.०७ रुपये याप्रमाणे

दिल्ली, मुंबईला गांजाचा विळखा!जगातील ‘टॉप टेन’ शहरांत समावेश

Web Title: Mumbai, Delhi in hemp, In the top 10 cities of the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.