Mumbai District Bank Election 2021 Results : मुंबै जिल्हा बँकेत प्रवीण दरेकरांचे वर्चस्व; सहकार पॅनलचा दणदणीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 11:39 AM2022-01-03T11:39:53+5:302022-01-03T11:40:46+5:30

Mumbai District Bank Election 2021 Results : आज झालेल्या मतमोजणीत प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेलचे चारही उमेदवार विजयी झाले.

Mumbai District Bank Election 2021 Results : BJP Pravin Darekar Led Sahakar Panel Win On All 21 Seats | Mumbai District Bank Election 2021 Results : मुंबै जिल्हा बँकेत प्रवीण दरेकरांचे वर्चस्व; सहकार पॅनलचा दणदणीत विजय

Mumbai District Bank Election 2021 Results : मुंबै जिल्हा बँकेत प्रवीण दरेकरांचे वर्चस्व; सहकार पॅनलचा दणदणीत विजय

googlenewsNext

मुंबई : मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतही भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. मुंबै बँक निवडणुकीत भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या पॅनेलचे एकहाती वर्चस्व राहिले. प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेल सर्व 21 जागांवर विजयी झाले आहेत. यातील 17 जागा याआधीच बिनविरोध झाल्या होत्या.  तर चार जागांसाठी निवडणूक झाली होती. या चार जागांची मतमोजणी आज पार पडली.

आज झालेल्या मतमोजणीत प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेलचे चारही उमेदवार विजयी झाले. मध्यवर्ती ग्राहक (होलसेल कंझ्यूमर्स) मतदार संघातून  विठ्ठल भोसले यांनी सुखदेव चौगुले यांचा पराभव केला. विठ्ठल भोसले यांना 18 मतं तर सुखदेव चौगुले यांना 16 मतं मिळाली.  प्राथमिक ग्राहक मतदार संघात पुरुषोत्तम दळवी यांनी कमलाकर नाईक यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. 

पुरुषोत्तम दळवी यांना 131 मतं तर कमलाकर नाईक यांना 59 मतं मिळाली. तर, महिला सहकारी संस्था मतदार संघ जयश्री पांचाळ यांना 332 मतं तर, शालिनी गायकवाड यांना 188 मतं मिळाली आहेत. याशिवाय, भटक्या जाती, विमुक्त जमाती व विशेष मागासवर्गीय मतदार संघातून अनिल गजरे यांना तब्बल  4 हजार  मते मिळाली तर,  यलाप्पा कुशाळकर यांना अवघी 350 मते मिळाली. 

दरम्यान, प्रवीण दरेकर यांच्या पॅनलमध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असलेल्या उमेदवारांचा समावेश होता. तर, शिवसेना बंडखोरांनी चार ठिकाणी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणूक प्रक्रिया पार पडली. मुंबै बँकेत अभिजीत घोसाळकर, सुनिल राऊत, अभिजीत अडसूळ, शिल्पा सरपोतदार हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते. मुंबै बँक निवडणुकीतून शिवसेना बंडखोर उमेदवार सुजाता पाटेकर, संजना घाडी आणि स्नेहा कदम यांनी माघार घेतली. तर कमलाकर नाईक यांनी बंडखोरी कायम ठेवली. मात्र, निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 

पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास - प्रवीण दरेकर
या विजयानंतर प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, मुंबै जिल्हा बँकेच्या मतदारांनी आमच्या कारभारावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. अनेकांनी मुंबै जिल्हा बँकेच्या कारभाराबाबत टीकाटिप्पणी केली होती. मात्र, मुंबईतील सहकार चळवळीतील कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. तसेच, नाबार्ड, आरबीआयच्या निकषात काम केल्याने बँकेचा विकास होत आहे. त्यामुळेच आमच्या पॅनलला यश मिळाले असल्याचे दरेकर यांनी म्हटले. 

विरोधकांचा नारळ फोडण्याचे काम केले -  प्रसाद लाड
बडोबाना थंड करण्याचे काम आज जिल्हा बँकेच्या निकालानंतर पहायला मिळाले. कुठलाही पक्ष न ठेवता निवडणुक लढण्याचा निर्णय झाल्यानंतरही ज्या चार जणांनी निवडणूक लढण्याचा निर्णय केला तरी देखील 2019 ची पुनरावृत्ती झाल्याचे पहायला मिळाले. 21 उमेदवार आम्ही निवडून आणले आणि विरोधकांचा नारळ फोडण्याचे काम आम्ही केले, अशी प्रतिक्रिया सहकार पॅनलचा दणदणीत विजय झाल्यानंतर भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे. 

Web Title: Mumbai District Bank Election 2021 Results : BJP Pravin Darekar Led Sahakar Panel Win On All 21 Seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.