मुंबई जिल्हा : डेंग्यू - ५७ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:05 AM2021-07-19T04:05:32+5:302021-07-19T04:05:32+5:30

मुंबई महापालिका काय करते? आपल्या घरात किंवा आजूबाजूच्या परिसरात कुठेही उघड्यावर साचलेले पाणी असणार नाही, याची काळजी घ्यावी, असे ...

Mumbai District: Dengue - 57 patients | मुंबई जिल्हा : डेंग्यू - ५७ रुग्ण

मुंबई जिल्हा : डेंग्यू - ५७ रुग्ण

Next

मुंबई महापालिका काय करते?

आपल्या घरात किंवा आजूबाजूच्या परिसरात कुठेही उघड्यावर साचलेले पाणी असणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई महापालिका मुंबईकरांना करत आहेत. डेंग्यू, मलेरियाला आळा बसावा, यासाठी डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्याच्या दृष्टीने घरांची व घरांच्या जवळपासच्या परिसराची महापालिकेकडून तपासणी करण्यात येत आहे.

याची होते तपासणी

इमारत परिसरातील पाण्याच्या टाक्या

झोपडपट्ट्यांमधील पाण्याचे पिंप

प्लास्टिक किंवा ताडपत्रीमध्ये साचलेले पाणी

परिसरात पडून असले टायर

टायरमध्ये साचलेले पाणी

झाडांच्या कुंड्यांखालील ताटल्या

शोभिवंत झाडांच्या कुंड्या

पाणी असणाऱ्या शोभेच्या वस्तू

नारळाच्या करवंट्या

फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या

बाटल्यांच्या झाकणांमधील पाणी

उपाय

घरांच्या बाहेर पाणी साठवण्यासाठी पिंप वा ड्रम वापरले जातात. यामध्ये डासांच्या अळ्या आढळून येतात. पाण्याचे पिंप हे आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे कोरडे ठेवावे. पिंप पूर्णपणे उलटे करून ठेवल्यानंतर काहीवेळाने हे पिंप कोरड्या व स्वच्छ कापडाने आतून पुसावे. पिंप आतून पुसत असताना ते दाब देऊन पुसावे जेणेकरून पिंपाच्या आतील बाजूला चिकटलेली डासांची अंडी नष्ट होतील. पिंपात पाणी भरल्यावर न विसरता स्वच्छ दुपदरी कपड्याद्वारे पिंपाचे तोंड बांधून ठेवावे, जेणेकरून या पिंपात डासांची मादी अंडी घालू शकणार नाहीत.

Web Title: Mumbai District: Dengue - 57 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.