मुंबई जिल्हा उपनगर को ऑप हौसिंग फेडरेशन शिवसेनेच्या ताब्यात, अध्यक्षपदी अभिषेक घोसाळकर यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 09:00 PM2021-11-22T21:00:29+5:302021-11-22T21:01:09+5:30

Mumbai News: मुंबईतील पूर्व तसेच पश्चिम उपनगरांतील गृहनिर्माण संस्थाच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत असलेल्या मुंबई जिल्हा उपनगर को ऑप हौसिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे माजी नगरसेवक , मुंबै बँक संचालक Abhishek Ghosalkar यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Mumbai District Suburban Co-op Federation under the control of Shiv Sena, appointment of Abhishek Ghosalkar as President | मुंबई जिल्हा उपनगर को ऑप हौसिंग फेडरेशन शिवसेनेच्या ताब्यात, अध्यक्षपदी अभिषेक घोसाळकर यांची नियुक्ती

मुंबई जिल्हा उपनगर को ऑप हौसिंग फेडरेशन शिवसेनेच्या ताब्यात, अध्यक्षपदी अभिषेक घोसाळकर यांची नियुक्ती

Next

मुंबई - मुंबईतील पूर्व तसेच पश्चिम उपनगरांतील गृहनिर्माण संस्थाच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत असलेल्या मुंबई जिल्हा उपनगर को ऑप हौसिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे माजी नगरसेवक , मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. घोसाळकर हे सद्या गृहनिर्माण संस्था विभागातून मुंबै बँकेचे प्रतिनिधित्व करत आहेत.यामुळे उपनगरातील हौसिंग फेडरेशनवर आता शिवसेनेचा भगवा फडकला आहे. संस्थेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली.

कार्यकारिणीत सचिवपदी महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशनचे रमेश प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभू हे डीम्ड कन्व्हेयन्स कायद्यासाठी शासनस्तरावर वारंवार पाठपुरावा करत आहेत. तर  उपाध्यक्षपदी अँड. समीर शिर्के,कृष्णा बांबरकर खजिनदार तर संचालकपदी डॉ.सुरेंद्र मोरे, मनोहर काजरोळकर, अँड. सुनील राणे, चंद्रकांत दुखंडे, शशिकांत मोरे, डॉ. मिहीर शहा,नंदकुमार वरणकर,दर्शना गोलतकर, प्रमोद शिंदे व विभूती पंड्या यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान धोकादायक तसेच पुनर्वसन रखडलेल्या गृहनिर्माण संस्थाच्या सभासदांना न्याय देण्यासाठी सर्वतोपरी कार्यरत राहण्याचे वचन अभिषेक घोसाळकर यांनी यावेळी दिले. तसेच उपनगरातील गृहनिर्माण संस्था सभासदांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव कार्यरत राहणार असल्याची ग्वाही यावेळी घोसाळकर यांनी दिली. गृहनिर्माण संस्थांचे डीम्ड कन्व्हेयन्स, उपविधी मधील दुरुस्ती आदी बाबतीत सभासदांना न्याय मिळवून देणार असल्याचे घोसाळकर यांनी यावेळी सांगितले. गृहनिर्माण संस्थाचा कारभार अधिक पारदर्शक करून संस्थाच्या प्राप्त तक्रारींवर निबंधक कार्यालयाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी म्हाडा सभापती (राज्यमंत्री दर्जा) डॉ. विनोद घोसाळकर, पालिकेचे माजी सभागृह नेते व वर्सोवा विधानसभा संघटक शैलेश फणसे, उपविभागप्रमुख राजेश शेट्ये, शाखाप्रमुख सतीश परब आदी मान्यवर उपस्थित होते. 

Web Title: Mumbai District Suburban Co-op Federation under the control of Shiv Sena, appointment of Abhishek Ghosalkar as President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.