Join us

मुंबई विभागातून ३ लाख ८३ हजार ३२० विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 6:00 AM

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत असून मुंबई ...

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत असून मुंबई विभागातून ३ लाख ८३ हजार ३२० विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. याशिवाय जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची संख्या १६,३०७ इतकी आहे.

नवीन अभ्यासक्रमानुसार होणारी ही पहिलीच परीक्षा आहे. तर जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी असणार आहे. या परीक्षेसाठी मुंबईत ९९९ परीक्षा केंद्रे असून, ९९९ केंद्र संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच ठाणे, रायगड, पालघर, दक्षिण, उत्तर व पश्चिम मुंबई मिळून ७५ परिरक्षक नेमण्यात आले आहेत. दहावीच्या परीक्षेचा पहिला पेपर १ मार्च रोजी होणार असून २२ मार्चला परीक्षा संपणार आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात काही अडचणी आल्यास विभागीय मंडळाच्या हेल्पलाइनद्वारे मार्गदर्शन घेण्याचे आवाहन शिक्षण मंडळाने केले असून राज्य मंडळ स्तरावरही हेल्पलाइन सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी पोहोचणे आवश्यक असल्याचे मुंबई विभागीय सचिव शरद खंडागळे यांनी स्पष्ट केले.‘बेस्ट’करून सवलतपरीक्षाकाळात विद्यार्थ्यांचा बसपास घरापासून नियोजित केंद्रापर्यंत वैध करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेगळे तिकीट घेण्याची गरज नाही. ही सुविधा २१ फेब्रुवारी ते २० मार्चपर्यंत बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि १ ते २२ मार्च दरम्यान दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असेल.