मुंबई विभागाची दलालांवर कडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:07 AM2021-01-14T04:07:22+5:302021-01-14T04:07:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने डिसेंबर २०२० महिन्यांत सखोल तपासणी व विशेष कारवाईदरम्यान एटीएसच्या पथकाने ...

Mumbai Division cracks down on brokers | मुंबई विभागाची दलालांवर कडक कारवाई

मुंबई विभागाची दलालांवर कडक कारवाई

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने डिसेंबर २०२० महिन्यांत सखोल तपासणी व विशेष कारवाईदरम्यान एटीएसच्या पथकाने तीन दलालांना अटक केली असून, त्यांच्याकडून ६.४३ लाख रुपयांची ४०० ई-तिकिटे जप्त केली आहेत.

कोरोना आणि देशव्यापी लॉकडाऊन आणि अनलॉकच्या पार्श्वभूमीवर, मध्य रेल्वे प्रवाशांसाठी विशेष आणि उत्सव विशेष गाड्या चालवीत आहे. मध्य रेल्वे मुंबई विभागातील दलालविरोधी पथक प्रवाशांना आरक्षित तिकिटे उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आरपीएफच्या मदतीने निरंतर तिकीट विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात येते.

एटीएसच्या पथकाने ११ जानेवारी रोजी केलेल्या तपासणीमध्ये ६२,५४५ रुपये किमतीची ६८ ई-तिकिटे जप्त करण्यात आली. २३ डिसेंबर रोजी अशाच प्रकारच्या कारवाईमध्ये रु. ४,९१,१५० किमतीची २७३ ई-तिकिटे आणि ८९,८३२ किमतीची ५९ ई-तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.

Web Title: Mumbai Division cracks down on brokers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.