लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई विभागाने इलेक्ट्रिकल, अकाउंट्स, सुरक्षा आणि वक्तशीरता शील्ड सोलापूर विभागासह संयुक्तपणे तसेच अभियांत्रिकी शील्ड नागपूर विभागासह संयुक्तपणे जिंकली. मुंबई विभागाच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनला स्वच्छतेसाठी सर्वोत्तम स्थानकासाठीचे (ए १, ए आणि बी श्रेणी स्थानकांखाली) शील्ड प्राप्त झाले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मध्य रेल्वे सभागृहात आयोजित कार्यक्रमात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी वर्ष २०२०-२१ मध्ये १३२ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट आणि अनुकरणीय कार्यासाठी वार्षिक पुरस्कार प्रदान केले. यावेळी मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक बी. के. दादाभोय, प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी डॉ. ए.के. सिन्हा आणि शील्ड मिळणाऱ्या विभागांचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यक्रमादरम्यान उपस्थित होते.
भुसावळ विभागाला ४ शील्ड ज्यामध्ये गौरवशाली ओव्हरऑल इफिशिएन्सी शील्ड, परीचालन, वाणिज्य, कार्मिक शील्ड तसेच वर्क एफिशियन्सी शील्ड आणि स्टोअर्स एफिशिएन्सी शील्ड हे नागपूर विभागासह संयुक्तपणे जिंकली.
महाव्यवस्थापकांनी विभागीय, कार्यशाळा, रेल्वे स्थानकांना आंतर-विभागीय कार्यक्षमता ढाल दिली. वैद्यकीय विभागातील २४ पुरस्कारप्राप्त होते. सांगली रेल्वे स्टेशनला सर्वोत्तम राखलेली बाग आणि कार्यशाळा कार्यक्षमता शील्ड माटुंगा वर्कशॉपने जिंकला. सर्वोत्कृष्ट निर्माण युनिट शील्ड उपमुख्य अभियंता (निर्माण) नागपूर यांनी सर्वोत्कृष्ट स्वच्छता विभाग शील्ड सोलापूर विभागाने जिंकली.