Join us

वर्षभरासाठी मुंबईला पाण्याचे टेन्शन नाही, तलावात ९९.०४ टक्के जलसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 3:38 AM

वर्षभर मुंबईकरांची तहान भागेल, एवढा जलसाठा तलावांमध्ये जमा झाला आहे.

मुंबई : वर्षभर मुंबईकरांची तहान भागेल, एवढा जलसाठा तलावांमध्ये जमा झाला आहे. दरवर्षी १ आॅक्टोबर रोजी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व तलावांचा आढावा घेऊन पाणीकपातीबाबत निर्णय घेतला जातो, पण या वर्षी सोमवार, ३० सप्टेंबर रोजी तलावांमध्ये १४ लाख ३३ हजार दशलक्ष लीटर म्हणजेच ९९.०४ टक्के इतका जलसाठा जमा आहे. आणखी १४ हजारदशलक्ष लीटर जमा झाल्यास वर्षभराचा पाण्याचा कोटा पूर्ण होणार आहे.मुंबईला वर्षभरासाठी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठ्याची गरज असते. गेल्या वर्षी ३० सप्टेंबर रोजी सर्व तलावांमध्ये एकूण १३ लाख २२ हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा होता, तर या वर्षी १४ लाख ३३ हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तलावांतील एकूण पाणीसाठा आठ टक्के जास्त आहे. त्यामुळे पुढच्या जून महिन्यापर्यंत मुंबईकरांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही.गेल्या वर्षी तलाव क्षेत्रात परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे १ आॅक्टोबर, २०१८ रोजी तब्बल दोन दशलक्ष लीटर पाणीसाठा कमी होता. त्यामुळे १८ नोव्हेंबरपासून मुंबईत सरसकट दहा टक्के पाणीकपात करावी लागली होती.मात्र, जुलैच्या पंधरवड्यात तलावांमध्ये ५० टक्के पाणीसाठा जमा झाल्यामुळे १० टक्के पाणीकपात रद्द करण्यात आली होती. सप्टेंबर संपत आला, तरी अद्याप मुसळधार सरी कोसळत असल्याने तलावांमध्ये जलसाठा वाढतचआहे.वर्षभरासाठी १४,४७,३६३ दशलक्ष लीटर पाण्याची गरजमुंबईकरांना वर्षभर पुरेसे पाणी मिळण्यासाठी १ आॅक्टोबर रोजी सातही धरणांत मिळून १४,४७,३६३ दशलक्ष लीटर पाणी असणे आवश्यक असते.मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज ३८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो.३० सप्टेंबर, २०१९ रोजी जमा झालेला १४ लाख ३३ हजार ४०४ दशलक्ष लीटर पाणीसाठा हा पुढील ३६२ दिवस पुरेल इतका आहे. 

टॅग्स :मुंबईधरणपाणी