Join us

मुंबईत गरिबांपेक्षा कुत्र्यांना अच्छे दिन, रोजच्या जेवणात मिळतो स्पेशल मेन्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 11:56 AM

शहरात गरिबांपेक्षा कुत्र्यांना अच्छे दिन आल्याचं पाहायला मिळतं आहे.

ठळक मुद्दे शहरात गरिबांपेक्षा कुत्र्यांना अच्छे दिन आल्याचं पाहायला मिळतं आहे.. मुंबई ही भटक्या कुत्र्यांना राहण्यासाठी उत्तम जागा झाली आहे.

मुंबई- शहरात गरिबांपेक्षा कुत्र्यांना अच्छे दिन आल्याचं पाहायला मिळतं आहे. मुंबई ही भटक्या कुत्र्यांना राहण्यासाठी उत्तम जागा झाली आहे. मुंबईत असणारे गरिब लोक फुटपाथवर राहतात, काहींना तर दोन वेळेचं जेवणही मिळत नाही. पण रस्त्यावर राहणाऱ्या भटक्या कुत्र्यांना मात्र खायला रोज स्पेशल मेन्यू मिळत असल्याचं पाहायला मिळतं आहे.

एक बॉलिवूड अभिनेत्री रोज सकाळी तिच्या घराच्या बाजूला असणाऱ्या डझनभर भटक्या कुत्र्यांना उकडलेलं चिकन आणि भात खायला देते. तर दुसरीकडे रोज गाडीतून येणारी एक महिला 100 भटक्या कुत्र्यांना जेवण खायला देते. ही महिला प्रत्येत ऋतुनुसार जेवण बनविण्यासाठी मसाले वापरते. सध्या पाऊस असल्याने हळद टाकून केलेलं जेवण कुत्र्यांना दिलं जातं. पावसाळ्यात कुत्र्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हळद उत्तम असल्याचं त्या महिलेचं म्हणणं आहे. मुंबईत राहणारी निहारीका किशन गांधी ही महिला दरोरज 100 भटक्या कुत्र्यांना जेवण देते. 

भारतात कुत्र्यांना न मारण्यासाठी कायदा आहे. निरोगी कुत्र्यांना मारणं भारतात बेकायेदशीर आहे. बागेमध्ये, हॉटेलच्या बाहेर किंवा अनेकदा रेल्वे स्टेशनवर कुत्रे दिसले की त्यांना दूर करण्यासाठी मारलं जातं. पण विनाकारण कुत्र्यांना मारणं ही चांगली गोष्टही नाही. रोबीज झाल्याच्या सगळ्यात जास्त घटना या भारतातच घडल्या आहेत. केरळमध्ये पहारेकऱ्यांना कुत्र्यांपासून धोका असल्याचं समजताच त्यांनी गेल्यावर्षी नोव्हेंबरपासून भटके कुत्रे शोधायला सुरूवात केली होती. पण त्यानंतर सुप्रीम कोर्टाने ते थांबविण्याचे आदेश दिले. काही जणांना कुत्र्यांविषयी विशेष प्रेम असतं. ते कुत्र्यांना भटकी कुत्री असं न म्हणता 'कम्युनिटी डॉग्स' असं म्हणतात. तसंच भारतात मुंबई हे कुत्र्यांना आश्रय घेण्याची योग्य जागा समजली जाते. 

मुंबईतील आढळलेल्या निळ्या रंगाच्या कुत्र्यांसाठी प्राणी मित्रांची धावकाही दिवसांपूर्वी नदी प्रदूषण किंवा कंपन्यांमधील प्रदूषण यांमुळे कुत्र्यांचा मूळ रंग बदलला असल्याची घटना समोर आली होती. मुंबईतील या कुत्र्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तळोजा औद्योगिक वसाहतीतील हा प्रकार होता. पण नंतर कुत्रा हा प्रदूषणामुळे नाही, तर रंग लागल्यामुळे निळा झाल्याचं नंतर स्पष्ट झालं. त्याच्या पोटात किंवा रक्तात कुठेही रसायनांचे अंश आढळलेले नाहीत, असं वैद्यकीय अहवालात स्पष्ट झालं. रसायनमिश्रित पाणी पिण्यामुळे या कुत्र्याचा रंग निळा झाल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं. त्यानंतर प्राणीमित्र आणि पर्यावरणप्रेमींचे लक्ष तळोजा औद्योगिक वसाहतीकडे वेधलं गेलं होतं. प्रदूषण नियंत्रण मंडळाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं होतं.  या निळ्या श्वानाला ‘ठाणे सोसायटी फॉर द प्रिव्हेशन ऑफ क्रुअल्टी टू अ‍ॅनिमल्स’ (एसपीसीए) या संस्थेने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ठेवलं होतं. त्याच्या रक्ताची, त्वचेचा तपासणी केली. केसांवर व त्वचेवर लागलेल्या रंगामुळे हा कुत्रा निळा झाल्याचे आणि त्याला धुतल्यानंतर त्याचा रंग पांढरा झाल्याचे एसपीसीएच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं होतं. यामध्ये विशेष बाब म्हणजे कुत्र्यांच्या मदतीसाठी अनेकांनी धाव घेतली.

भारत देश युनिक आहे, असं एथिकल ट्रिटमेंट ऑफ अॅनिमलचे सह-संस्थापक इनड्रिड न्यूकर्क यांनी म्हंटलं आहे.

तळोज्यातील फॅक्टरीमध्ये काम करणारे काही कामगार आणि गावातील लोक कुत्र्यांना अंघोळ घालण्यासाठी खास शॅम्पू आणतात. पण ते कुत्रे घरात रहात नसून घराच्या आसपासच्या परिसरात राहतात.