Join us

Mumbai Dongri Building Collapsed : इमारत दुर्घटनेत 13 ठार तर 10 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 6:36 AM

डोंगरी भागातील चार मजली केसरबाई इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला,

मुंबई : येथील डोंगरी भागातील चार मजली केसरबाई इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला, तर 10 जण जखमी झाले. ही दुर्घटना मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. जखमींवर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू असून जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. ढिगाऱ्याखाली अजून अनेक जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात असून रात्री उशिरापर्यंत ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते.

काही दिवसांपूर्वीच मालाड येथे जलाशयाची भिंत झोपड्यांवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत निष्पाप बळी गेले होते. या दुर्घटनेला काही दिवस होत नाहीत तोच आता डोंगरीमध्ये इमारत कोसळून निष्पाप जीवांचा बळी गेल्याने महापालिकेच्या गलथान कारभारावर सर्वच स्तरांतून टीका केली जात आहे.

मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास डोंगरी येथील केसरबाई इमारत कोसळल्याची घटना घडली आणि मुंबईकरांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण दुर्घटना घडल्यानंतर कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाºयाखाली सुमारे पन्नास जण अडकल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. दुर्घटनाग्रस्त इमारतीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत स्थानिकांनी बचावकार्य सुरू केले होते. विशेषत: युवकांनी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावपळ केली. काही वेळाने राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकही (एनडीआरएफ) घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या मदतीने घटनास्थळावरील डेब्रिज उपसण्याचे काम सुरू होते. महापालिकेचे १०० हून अधिक कामगार घटनास्थळी कार्यरत असतानाच बचावकार्य वेगाने व्हावे आणि घटनास्थळाहून जखमींना वेगाने रुग्णालयात दाखल करता यावे म्हणून दहा रुग्णवाहिका येथे तैनात करण्यात आल्या होत्या. चिंचोळ्या गल्ल्यांसह घटनास्थळी झालेल्या गर्दीमुळे बचावकार्यात अडथळे येत होते. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.>मुलीची सुटका : ढिगा-याखालून मंगळवारी रात्रीपर्यंत९ जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले. दुपारी दोन वाजता एका १५ ते १६ वर्षांच्या मुलीला सुरक्षितरीत्या बाहेर काढले. याचदरम्यान ढिगाºयाखाली दोन वर्षांची एक लहान मुलगी अडकल्याचे दिसले. तिचीही सुटका केली. इमारत दुर्घटनेप्रकरणी डोंगरी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत, अधिक तपास सुरू केला आहे.>मृतांची नावे : सायरा रिहान शेख (२०), मुझामिल मनसुर सलमानी (१५), अब्दुल सतोर कालू शेख (५५), साबीया नसीर शेख (६०), जावेद इस्माईल (३४), अरहन शेहजाद (४०), कश्यप्पा अमीराजान (१३), सना सलमानी (२५), झुबेर मन्सुर सलमानी (२०), इब्राहिम (१.५)>पालिका, म्हाडाने जबाबदारी झटकलीदुर्घटनाग्रस्त इमारत कोणाच्या अखत्यारीत आहे, यावरून महापालिकाआणि म्हाडात वाद निर्माण झाला आहे. सदर इमारत म्हाडाची असल्याचे मुंबई महापालिकेने म्हटले आहे. तर दुर्घटनाग्रस्त केसरबाई इमारत ही म्हाडाच्या कार्यक्षेत्रातील असून ती कोसळलेली नाही, तर या इमारतीच्या मागील अनधिकृतरीत्या बांधलेला भाग कोसळला आहे. हा कोसळलेला भाग म्हाडाच्या कार्यक्षेत्रात येत नाही, असे स्पष्टीकरण म्हाडाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे.>डोंगरी परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी केली जाईल. ही इमारत शंभर वर्षे जुनी आहे. त्यामुळे ती धोकादायक म्हणून घोषित केली होती. तिच्या पुनर्विकासाचे काम विकासकाकडे सोपविण्यात आले होते. पण त्यामध्ये दिरंगाई का झाली याची चौकशी केली जाईल. बचाव व मदतकार्यानंतर दुर्घटनेची चौकशी व अन्य आवश्यक बाबींवर निर्णय घेण्यात येईल.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीसरकारकडून मृतांचे नातेवाईक वा जखमींना मदतीची घोषणा केली गेली नाही.

टॅग्स :इमारत दुर्घटना