Mumbai Dongri Building Collapsed Live Updates: मुंबईतील डोंगरीत इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 01:03 PM2019-07-16T13:03:11+5:302019-07-16T20:17:23+5:30
मुंबई : मुंबईतील डोंगरी भागात असलेल्या कौसरबाग इमारतीचा निम्मा भाग कोसळल्याची घटना मंगळवारी घडली. यामध्ये 40 ते 50 जण ...
मुंबई : मुंबईतील डोंगरी भागात असलेल्या कौसरबाग इमारतीचा निम्मा भाग कोसळल्याची घटना मंगळवारी घडली. यामध्ये 40 ते 50 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, पोलीस आणि अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्यास सुरुवात करण्यात आली आहे.
LIVE
08:24 PM
डोंगरी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा दहावर
#UPDATE Mumbai: Death toll rises to 10 in the Kesarbhai building collapse in Dongri, today. 8 people have been injured in the incident, so far. #Maharashtrapic.twitter.com/y4PvNenDaD
— ANI (@ANI) July 16, 2019
06:14 PM
डोंगरी इमारत दुर्घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले दु:ख
Union Home Minister Amit Shah: #MumbaiBuildingCollapse is very tragic. My condolences with the bereaved families&prayers for early recovery of those injured. Rescue operations are in full swing. State govt, NDRF and local authorities are doing their best to assist people in need. pic.twitter.com/gBDa7HGbDh
— ANI (@ANI) July 16, 2019
05:48 PM
मुंबईत डोंगरी परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
05:21 PM
मुंबईमध्ये पावसाळ्यात दरवर्षी होणाऱ्या घटना दुर्दैवी - मिलिंद देवरा
Milind Deora, Congress on #MumbaiBuildingCollapse: This is unfortunately something that happens in Mumbai every year during monsoon. You'll see walls collapse, there are pot holes on roads where people die, young boys fall into manholes. Mumbaikars must ask what the govt is doing pic.twitter.com/a8rYKVlyRD
— ANI (@ANI) July 16, 2019
05:00 PM
डोंगरी इमारत दुर्घटनेतील आतापर्यंत सापडलेल्या मृत आणि जखमींची यादी
04:56 PM
मुंबईत डोंगरी परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत चार जणांचा मृत्यू
Maharashtra: Death toll rises to 4 in the Kesarbhai building collapse in Dongri, Mumbai, today. 3 teams of National Disaster Response Force (NDRF) are engaged in rescue operations. #MumbaiBuildingCollapsepic.twitter.com/mN23bG9Bmp
— ANI (@ANI) July 16, 2019
04:43 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डोंगरी इमारत दुर्घटनेबाबत व्यक्त केले दु:ख
PM Narendra Modi: Collapse of a building in Mumbai’s Dongri is anguishing. My condolences to the families of those who lost their lives. I hope the injured recover soon. Maharashtra Government, NDRF and local authorities are working on rescue operations & assisting those in need. pic.twitter.com/DGd77ulof8
— ANI (@ANI) July 16, 2019
04:03 PM
दुर्घटनेत तिघांचा मृत्यू तर आठ जण जखमी
#UPDATE Mumbai Police: Death toll rises to 3 in the Kesarbhai building collapse in Dongri, today. 8 people have been injured in the incident, so far. pic.twitter.com/MUUYabGXA4
— ANI (@ANI) July 16, 2019
03:23 PM
'ती' इमारत धोकादायक असल्याचं 2017 साली कळविलं होतं- महानगरपालिका
Brihanmumbai Municipal Corporation (BMC) in a letter dated 7 August 2017 on Kesarbhai building that collapsed in Dongri, today: Building is classified as 'C1', to be evacuated for demolition at the earliest...In event of any mishap this office won't be responsible. #Maharashtrapic.twitter.com/h2XEaV4LxF
— ANI (@ANI) July 16, 2019
03:20 PM
'राज्य सरकार जबाबदार अन् मनपा चालवणारे निर्लज्जम् सदा सुखी'
#Mumbai Dongri Building Collapsed: 'राज्य सरकार जबाबदार अन् मनपा चालवणारे निर्लज्जम् सदा सुखी' https://t.co/S8JXk2STWW#Dongri@dhananjay_munde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@ShivSena@mybmc@NCPspeaks
— Lokmat (@MiLOKMAT) July 16, 2019
03:13 PM
म्हाडाने इमारत पुनर्विकासासाठी दिली होती, उदय सामंत यांची माहिती
02:47 PM
मनपा चालवणारे निर्लज्जम् सदा सुखी आहेत - धनंजय मुंडे
मनपा चालवणारे निर्लज्जम् सदा सुखी आहेत. डोंगरी भागातली कौसरबाग ही इमारत धोकादायक असल्याची तक्रार वारंवार केली गेली मात्र भसम्या झाल्यागत भ्रष्टाचारी महानगरपालिकेला पैसे गिळण्याशिवाय वेळ मिळाला तर ते लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष देईल ना! pic.twitter.com/B2M6xXgQSV
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 16, 2019
02:34 PM
मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे घटनास्थळी दाखल झाले आहेत.
01:55 PM
लहान मुलाला वाचविण्यात जवानांना यश
Mumbai: A child rescued from the building collapse site in Dongri, he has been admitted to hospital and is stable pic.twitter.com/LawktNSdR7
— ANI (@ANI) July 16, 2019
01:35 PM
दोन महिलांचा मृत्यू
इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन महिलांचा मृतदेह आणि एका लहान मुलासह तीन जखमींना बाहेर काढण्यात आले आहे.
01:35 PM
इमारत 100 वर्षे जुनी होती - मुख्यमंत्री
इमारत 100 वर्षे जुनी होती. धोकादायक इमारतीच्या यादीत तिचा समावेश नव्हता. इमारतीच्या पुनर्विकासासाठी विकासकाला काम दिले होते. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या इमारतीत 15 कुटुंब राहत असल्याची माहिती आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Maharashtra CM Devendra Fadnavis on Dongri building collapse: As per the initial information I have received, around 15 families are feared trapped in the collapse. The building is around 100 yrs old. The entire focus is on rescuing the people trapped. Investigation will be done. pic.twitter.com/ApIVqmNLMb
— ANI (@ANI) July 16, 2019
01:33 PM
चिंचोळ्या गल्ल्यांमुळे बचावकार्यात अडथळे
चिंचोळ्या गल्ल्यांमुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. मानवी साखळीद्वारे ढिगारा बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.
01:27 PM
कोसळलेली कौसर बाग इमारत म्हाडाची, मुंबई महापालिकेची माहिती
01:19 PM
आतापर्यंत तीन जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश
01:11 PM
डाेंगरी परिसरातील इमारती 50 वर्षे जुन्या आहेत.
01:09 PM
कौसर बाग इमारतीच्या शेजारील इमारतीही रिकाम्या करण्याचे काम सुरु आहे.
01:05 PM
40 ते 50 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती असून बचावकार्य आहे.
#Mumbai: Search and rescue operation underway at Dongri building collapse site. pic.twitter.com/KkKOyC4p3N
— ANI (@ANI) July 16, 2019
01:05 PM
अरुंद गल्ल्यांमुळे मदत कार्याला अडचण
VIDEO : मुंबईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला, 40 ते 50 जण अडकल्याची भीती https://t.co/13amjBRtLA
— Lokmat (@MiLOKMAT) July 16, 2019