Join us

Mumbai Dongri Building Collapsed Live Updates: मुंबईतील डोंगरीत इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 1:03 PM

मुंबई : मुंबईतील डोंगरी भागात असलेल्या कौसरबाग इमारतीचा निम्मा भाग कोसळल्याची घटना मंगळवारी घडली. यामध्ये 40 ते 50 जण ...

16 Jul, 19 08:24 PM

डोंगरी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा दहावर



 

16 Jul, 19 06:14 PM

डोंगरी इमारत दुर्घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले दु:ख



 

16 Jul, 19 05:48 PM

मुंबईत डोंगरी परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू

16 Jul, 19 05:21 PM

मुंबईमध्ये पावसाळ्यात दरवर्षी होणाऱ्या घटना दुर्दैवी - मिलिंद देवरा



 

16 Jul, 19 05:00 PM

डोंगरी इमारत दुर्घटनेतील आतापर्यंत सापडलेल्या मृत आणि जखमींची यादी

16 Jul, 19 04:56 PM

मुंबईत डोंगरी परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आतापर्यंत चार जणांचा मृत्यू



 

16 Jul, 19 04:43 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डोंगरी इमारत दुर्घटनेबाबत व्यक्त केले दु:ख



 

16 Jul, 19 04:03 PM

दुर्घटनेत तिघांचा मृत्यू तर आठ जण जखमी



 

16 Jul, 19 03:23 PM

'ती' इमारत धोकादायक असल्याचं 2017 साली कळविलं होतं- महानगरपालिका



 

16 Jul, 19 03:20 PM

'राज्य सरकार जबाबदार अन् मनपा चालवणारे निर्लज्जम् सदा सुखी'



 

16 Jul, 19 03:13 PM

म्हाडाने इमारत पुनर्विकासासाठी दिली होती, उदय सामंत यांची माहिती

16 Jul, 19 02:47 PM

मनपा चालवणारे निर्लज्जम् सदा सुखी आहेत - धनंजय मुंडे



 

16 Jul, 19 02:34 PM

मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

16 Jul, 19 01:35 PM

इमारत 100 वर्षे जुनी होती - मुख्यमंत्री

इमारत 100 वर्षे जुनी होती. धोकादायक इमारतीच्या यादीत तिचा समावेश नव्हता. इमारतीच्या पुनर्विकासासाठी विकासकाला काम दिले होते. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या इमारतीत 15 कुटुंब राहत असल्याची माहिती आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.



 

16 Jul, 19 01:55 PM

लहान मुलाला वाचविण्यात जवानांना यश



 

16 Jul, 19 01:35 PM

दोन महिलांचा मृत्यू 

इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन महिलांचा मृतदेह आणि एका लहान मुलासह तीन जखमींना बाहेर काढण्यात आले आहे. 

16 Jul, 19 01:33 PM

चिंचोळ्या गल्ल्यांमुळे बचावकार्यात अडथळे

चिंचोळ्या गल्ल्यांमुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. मानवी साखळीद्वारे ढिगारा बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

16 Jul, 19 01:05 PM

अरुंद गल्ल्यांमुळे मदत कार्याला अडचण



 

16 Jul, 19 01:27 PM

कोसळलेली कौसर बाग इमारत म्हाडाची, मुंबई महापालिकेची  माहिती

16 Jul, 19 01:19 PM

आतापर्यंत तीन जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश

16 Jul, 19 01:11 PM

डाेंगरी परिसरातील इमारती 50 वर्षे जुन्या आहेत.

16 Jul, 19 01:09 PM

कौसर बाग इमारतीच्या शेजारील इमारतीही रिकाम्या करण्याचे काम सुरु आहे.

16 Jul, 19 01:05 PM

  40 ते 50 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती असून बचावकार्य आहे.