Mumbai Dongri Building Collapsed :  दिवसभरात काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 01:36 AM2019-07-17T01:36:05+5:302019-07-17T01:36:16+5:30

११.४० वाजता डोंगरी येथील निशानपाडा क्रॉस रोड येथील केसरबाई इमारत दुर्घटना घडली.

Mumbai Dongri Building Collapsed: What Happens During the Day? | Mumbai Dongri Building Collapsed :  दिवसभरात काय घडले?

Mumbai Dongri Building Collapsed :  दिवसभरात काय घडले?

Next

११.४० वाजता डोंगरी येथील निशानपाडा क्रॉस रोड येथील केसरबाई इमारत दुर्घटना घडली.
११.४५ वाजता स्थानिक रहिवाशांकडून आपत्कालीन सेवेला कळविण्यात आले.
१२.०० वाजता घटनेची
माहिती मिळताच अग्निशमन दल, रुग्णवाहिका, पालिकेचे आपत्कालीन पथक पोहोचले. घटनास्थळी पोहोचण्यास चिंचोळी जागा असल्याने तेथे यंत्रणा घेऊन जाणे अवघड होत होते.
१२.१० वाजता रुग्णावाहिका, अग्निशमन गाड्या आल्या.
१२.३२ वाजता पाच अग्निशमन गाड्या, १०८ क्रमांकाच्या ५ रुग्णवाहिका आल्या.
१२.५० वाजता एनडीआरएफ जवानांना मदतकार्यासाठी बोलाविण्यात आले.
१.१५ वाजता एनडीआरएफ
जवान घटनास्थळी पोहोचले.
१.२३ वाजता दोन मृत्यू आणि ३ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली.
१.२४ वाजता घटनास्थळी
१० रुग्णवाहिका आल्या.
१.२६ वाजता दोन वर्षांच्या मुलीला ढिगाऱ्याखालून सुखरूप काढण्यात आले.
१.३० वाजता ढिगारा
बाजूला काढण्याच्या कामाने
वेग धरला होता. स्थानिक आणि सुरक्षा पथक वेगाने कामे करत होती.
१.४५ वाजता कोसळलेल्या इमारतीच्या नजीकच्या इमारतीमधील रहिवाशांना तात्पुरते इमामबाबा शाळेत स्थलांतरित करण्यात आले.
१.५० वाजता पोलीस आयुक्त
संजय बर्वे घटनास्थळी आले.
२.०० वाजता जखमींना जे. जे.
रुग्णालय आणि हबिब रुग्णालयात दाखल करण्यात आले.
२.०५ वाजता स्थानिक
रहिवासी आणि एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने ढिगारा काढला जात होता. मृत अथवा जखमींना जवानांच्या माध्यमातून मानवी साखळी पद्धतीने रुग्णवाहिकेत नेले जात होते.
२.१५ वाजता पायधुनी वाहतूक
पोलीस चौकी येथील एका बाजूकडील रस्ता बंद करण्यात आला.
२.३० वाजता जे.जे. रुग्णालयात
७ जखमींना नेण्यात आले. तर, हाबिब रुग्णालयात २ जखमींना नेण्यात आले.
२.५१ वाजता गृहनिर्माण
आणि शहरी विभाग मंत्रालय
राधाकृष्ण विखे पाटील आले.
३.१५ वाजता एनडीआरएफ, आपत्कालीन यंत्रणा यांच्याद्वारे ढिगारा काढण्याचे काम सुरू होते.
४.१० वाजता डोंगरीच्या दुर्घटनेत
तीन जणांना मृत घोषित केले.
४.५० वाजता डोंगरीच्या दुर्घटनेत
चार जणांना मृत घोषित केले.
५.१४ वाजता पालिकेचे
आयुक्त प्रवीण परदेशी आले.
५.५३ वाजता पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी डोंगरी येथील दुर्घटनेविषयी दु:ख व्यक्त केले.
६.२० वाजता सात जणांना मृत घोषित करण्यात आले. हबिब रुग्णालयातून एका रुग्णास सोडण्यात आले.
७.५४ वाजता १० जणांना
मृत घोषित करण्यात आले.

Web Title: Mumbai Dongri Building Collapsed: What Happens During the Day?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.