Join us

Mumbai Dongri Building Collapsed :  दिवसभरात काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 1:36 AM

११.४० वाजता डोंगरी येथील निशानपाडा क्रॉस रोड येथील केसरबाई इमारत दुर्घटना घडली.

११.४० वाजता डोंगरी येथील निशानपाडा क्रॉस रोड येथील केसरबाई इमारत दुर्घटना घडली.११.४५ वाजता स्थानिक रहिवाशांकडून आपत्कालीन सेवेला कळविण्यात आले.१२.०० वाजता घटनेचीमाहिती मिळताच अग्निशमन दल, रुग्णवाहिका, पालिकेचे आपत्कालीन पथक पोहोचले. घटनास्थळी पोहोचण्यास चिंचोळी जागा असल्याने तेथे यंत्रणा घेऊन जाणे अवघड होत होते.१२.१० वाजता रुग्णावाहिका, अग्निशमन गाड्या आल्या.१२.३२ वाजता पाच अग्निशमन गाड्या, १०८ क्रमांकाच्या ५ रुग्णवाहिका आल्या.१२.५० वाजता एनडीआरएफ जवानांना मदतकार्यासाठी बोलाविण्यात आले.१.१५ वाजता एनडीआरएफजवान घटनास्थळी पोहोचले.१.२३ वाजता दोन मृत्यू आणि ३ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली.१.२४ वाजता घटनास्थळी१० रुग्णवाहिका आल्या.१.२६ वाजता दोन वर्षांच्या मुलीला ढिगाऱ्याखालून सुखरूप काढण्यात आले.१.३० वाजता ढिगाराबाजूला काढण्याच्या कामानेवेग धरला होता. स्थानिक आणि सुरक्षा पथक वेगाने कामे करत होती.१.४५ वाजता कोसळलेल्या इमारतीच्या नजीकच्या इमारतीमधील रहिवाशांना तात्पुरते इमामबाबा शाळेत स्थलांतरित करण्यात आले.१.५० वाजता पोलीस आयुक्तसंजय बर्वे घटनास्थळी आले.२.०० वाजता जखमींना जे. जे.रुग्णालय आणि हबिब रुग्णालयात दाखल करण्यात आले.२.०५ वाजता स्थानिकरहिवासी आणि एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीने ढिगारा काढला जात होता. मृत अथवा जखमींना जवानांच्या माध्यमातून मानवी साखळी पद्धतीने रुग्णवाहिकेत नेले जात होते.२.१५ वाजता पायधुनी वाहतूकपोलीस चौकी येथील एका बाजूकडील रस्ता बंद करण्यात आला.२.३० वाजता जे.जे. रुग्णालयात७ जखमींना नेण्यात आले. तर, हाबिब रुग्णालयात २ जखमींना नेण्यात आले.२.५१ वाजता गृहनिर्माणआणि शहरी विभाग मंत्रालयराधाकृष्ण विखे पाटील आले.३.१५ वाजता एनडीआरएफ, आपत्कालीन यंत्रणा यांच्याद्वारे ढिगारा काढण्याचे काम सुरू होते.४.१० वाजता डोंगरीच्या दुर्घटनेततीन जणांना मृत घोषित केले.४.५० वाजता डोंगरीच्या दुर्घटनेतचार जणांना मृत घोषित केले.५.१४ वाजता पालिकेचेआयुक्त प्रवीण परदेशी आले.५.५३ वाजता पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी डोंगरी येथील दुर्घटनेविषयी दु:ख व्यक्त केले.६.२० वाजता सात जणांना मृत घोषित करण्यात आले. हबिब रुग्णालयातून एका रुग्णास सोडण्यात आले.७.५४ वाजता १० जणांनामृत घोषित करण्यात आले.

टॅग्स :इमारत दुर्घटना