Join us

मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ३५९ दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत मंगळवारी काेराेनाचे ५९४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २ लाख ६८ हजार २९७ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत मंगळवारी काेराेनाचे ५९४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २ लाख ६८ हजार २९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे रुग्णदर प्रमाण ९३ टक्क्यांवर पोहोचला असून रुग्ण दुपटीचा काळ ३५९ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या ७ हजार ६५० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात काेराेनाच्या ५०३ रुग्ण आणि ११ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या २ लाख ८७ हजार ८१६ झाली असून मृतांचा आकडा ११ हजार १९ झाला आहे.

मुंबईत चाळ व झोपडपट्टीच्या वस्तीत सक्रिय कंटेन्मेंट झोन्सची संख्या २५६ असून २ हजार ८६२ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मागील २४ तासांत पालिकेने २ हजार ५४५ अतिजोखमीच्या रुग्णांचा शोध घेतला आहे.