मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ४८१ दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:23 AM2021-02-05T04:23:11+5:302021-02-05T04:23:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत रविवारी ५०३ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २ लाख ८७ हजार ५१५ रुग्ण ...

In Mumbai, the doubling period is 481 days | मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ४८१ दिवसांवर

मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ४८१ दिवसांवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत रविवारी ५०३ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २ लाख ८७ हजार ५१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे, तर रुग्ण दुपटीचा कालावधी ४८१ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या ६ हजार ३२८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहर, उपनगरात १७ ते २३ जानेवारी या कालावधीत मुंबईतील एकूण कोविडवाढीचा दर ०.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत २७ लाख ६ हजार २०० चाचण्या झाल्या आहेत. दिवसभरात ४७९ रुग्ण आणि ७ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, बाधितांची एकूण संख्या ३ लाख ६ हजार ४५ झाली असून मृतांचा आकडा ११ हजार २३५ झाला आहे. चाळ व झोपडपट्टीच्या वस्तीत सक्रिय कंटेनमेंट झोन्सची संख्या १७२ असून २ हजार १४४ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मागील २४ तासांत पालिकेने ३ हजार ४९३ अतिजोखमीच्या रुग्णांचा शोध घेतला आहे.

..............

Web Title: In Mumbai, the doubling period is 481 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.