Join us

मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी अवघ्या ४० दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत रविवारच्या तुलनेत दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे, सोमवारी मुंबईत ९ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत रविवारच्या तुलनेत दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे, सोमवारी मुंबईत ९ हजार ८५७ रुग्ण आणि २१ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, कोरोना बाधितांची एकूण संख्या ४ लाख ६२ हजार ३०२ झाली असून, मृतांचा आकडा ११ हजार ७९७ झाला आहे. मुंबईत उपचाराधीन रुग्णांची संख्या ७४ हजार ५२२ झाली असून, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी अवघ्या ४० दिवसांवर आला आहे.

मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८१ टक्के असून, २९ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.७० टक्के आहे. शहर उपनगरात सोमवारी ३६ हजार ८७८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून, आतापर्यंत ४३ लाख ६ हजार ५३ कोरोना चाचण्या केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईतील झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात सक्रिय कंटेनमेंट झोन्सची संख्या ७० असून, सक्रिय सीलबंद इमारती ७४८ इतक्या आहेत. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील २४ हजार ६ अतिजोखमीच्या सहवासांचा शोध घेतला आहे.

रुग्ण दुप्पटीच्या कालावधीतील घट चिंताजनक

तारीखकालावधी (दिवस)

५ एप्रिल ४०

४ एप्रिल४२

३ एप्रिल४४

२ एप्रिल४६

१ एप्रिल४९

३१ मार्च४९

३० मार्च ५०