Join us

आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणाच्या तपासात अनेक त्रुटी होत्या, एनसीबीच्या अहवालात मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 8:02 PM

मागील काही महिन्यांपूर्वी बॉलीवूड स्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज केस प्रकरणी मुंबईत एनसीबीने ताब्यात घेतले होते.

मुंबई- मागील काही महिन्यांपूर्वी बॉलीवूड स्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज केस प्रकरणी मुंबईत एनसीबीने ताब्यात घेतले होते. आता या प्रकरणी नवा खुलासा समोर आला आहे. आर्यन खान संबंधित प्रकरणामध्ये अँटी ड्रग्स एजन्सीला अनेक त्रुटी आढळल्या आहेत. एनसीबी दक्षताच्या विशेष चौकशी पथकाने आपला अहवाल दिल्ली मुख्यालयाला सादर केला आहे. 

या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने झाला नसल्याचे या अहवालात म्हटले आहे. या तपासात जे अधिकारी कार्यरत होते ते आजही कार्यरत असल्याचा दावाही अहवालात करण्यात आला असून, त्यांच्या कामात अनेक उणिवा होत्या त्या या तपासादरम्यान समोर आल्या आहेत, असंही या अहवालात म्हटले आहे. 

एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या संदर्भात माहिती दिली आहे. या प्रकरणात पुरावे नसतानाही तपास सुरू असून, प्रकरण पुढे नेले जात आहे. या प्रकरणात ४ वेळा ६५ जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून, हे लोक वारंवार जबाब बदलत होते. त्यामुळे अनेकांचे जबाब कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आले आहेत, असंही त्या अधिकाऱ्याने सांगितले. 

या प्रकरणाच्या तपासादरम्यान अशा काही गोष्टी पथकासमोर आल्या आहेत, ज्यामुळे इतर प्रकरणांच्या तपासातही त्रुटी असल्याचे दिसून आले आहे. या सर्व प्रकरणांचा अहवाल दिल्लीला पाठवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये पैशांचा व्यवहार झाला आहे का, याचा तपास सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

आर्यन खानला जाणूनबुजून टार्गेट करण्यात आल्याचेही या प्रकरणाच्या तपासात उघड झाले आहे, मात्र असे का करण्यात आले हे अद्यापही समोर आलेले नाही. एनसीबीच्या तपास पथकाला या प्रकरणात ७ ते ८ एनसीबी अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटली आहे. ज्याची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. आणखी दोन प्रकरणात या अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका असल्याचे समोर आले आहे, असंही ते अधिकारी म्हणाले. 

पीएफआय संदर्भात मोठा खुलासा! व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा अ‍ॅडमिन पाकिस्तानी, वाचा सविस्तर

आर्यन खान याला क्लीन चिट दिली आहे. एनसीबीला आर्यन आणि इतर पाच जणांविरुद्ध पुरेसे पुरावे सापडले नाहीत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईतील एका क्रूझमधून अटक करण्यात आलेल्या २० जणांमध्ये आर्यन खानचा समावेश होता.

टॅग्स :आर्यन खाननार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोबॉलिवूडशाहरुख खान