जोरदार पावसामुळे मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक रद्द, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 10:56 AM2018-07-08T10:56:39+5:302018-07-08T11:09:45+5:30
रविवारी पहाटेपासूनच मुंबई- ठाणे परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार पावसाने रेल्वे रुळांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
मुंबई - रविवारी पहाटेपासूनच मुंबई- ठाणे परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार पावसाने रेल्वे रुळांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पण पश्चिम व हार्बर रेल्वे मार्गावरील नियोजित मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कुर्ला ते वाशी स्टेशनदरम्यान दुपारी 11.10 ते दुपारी 4.10 या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्वेवर विद्याविहार व भायखळा स्टेशनदरम्यान धीम्या मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार होता. मात्र आता तो रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, जोरदार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे अर्धा तास तर हार्बर रेल्वेवरील वाहतूक 20 मिनिटे उशिराने सुरू आहे.
(घाटकोपरचा पूर्व-पश्चिम भागाला जोडणारा पूल झुकला, वाहतूक बंद)
पश्चिम रेल्वे
सांताक्रुझ-गोरेगाव स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर दोन्ही दिशेने सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 या वेळेत मेगाब्लॉक आहे.
हार्बर रेल्वे
कुर्ला आणि वाशी स्थानकादरम्यान सकाळी 11 वाजून 10 मिनिटं ते दुपारी 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.