Join us

मुंबईतलं डंपिंग ग्राऊंड अंबरनाथमध्ये हलवणार, न्यायालयाचे सरकारला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2018 1:48 PM

मुंबईच्या कच-याचा मोठा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या डंपिंग ग्राऊंडसाठी अंबरनाथमध्ये जागा देण्याचे आदेश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत.

मुंबईः मुंबईच्या कच-याचा मोठा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या डंपिंग ग्राऊंससाठी अंबरनाथमध्ये जागा देण्याचे आदेश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. अंबरनाथमधील 'करवले' गावातील 30 एकर जागा देण्याचं राज्य सरकारकडून निश्चित करण्यात आलं आहे. अंबरनाथमधल्या 30 एकरांच्या जागेवर मुंबईतलं नवं डम्पिंग ग्राऊंड तयार होणार आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयानं करवले गावातील 30 एकरची जागा पुढील 3 महिन्यांत बीएमसीच्या ताब्यात देण्याचे निर्देशही राज्य सरकारला दिले आहेत. तसेच देवनारमधील डंपिंग ग्राऊंड कधी बंद करणार, असा प्रश्नही न्यायालयानं मुंबई महापालिकेला विचारला आहे. 

टॅग्स :अंबरनाथकचरा