मुंबईत काेराेना रुग्ण दुपटीचा कालावधी ३५८ दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:07 AM2020-12-26T04:07:03+5:302020-12-26T04:07:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत शुक्रवारी काेराेनाचे ३७७ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २ लाख ६९ हजार ६७२ ...

In Mumbai, the duration of carena doubling is 358 days | मुंबईत काेराेना रुग्ण दुपटीचा कालावधी ३५८ दिवसांवर

मुंबईत काेराेना रुग्ण दुपटीचा कालावधी ३५८ दिवसांवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत शुक्रवारी काेराेनाचे ३७७ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २ लाख ६९ हजार ६७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे शहर, उपनगरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांवर पोहोचले आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३५८ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या ७ हजार ६५० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहर, उपनगरात १८ ते २४ डिसेंबर या कालावधीत मुंबईतील एकूण कोविडवाढीचा दर ०.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत २२ लाख ८० हजार ६६८ चाचण्या झाल्या आहेत. दिवसभरात काेराेनाच्या ५९६ रुग्णांचे निदान झाले असून ११ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, शहर-उपनगरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या २ लाख ८९ हजार ८०० झाली असून मृतांचा आकडा ११ हजार १९ झाला आहे.

मुंबईत चाळ व झोपडपट्टीच्या वस्तीत सक्रिय कंटेनमेंट झोन्सची संख्या ३०२ असून २ हजार ७८३ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मागील २४ तासांत पालिकेने ३ हजार ३८० अतिजोखमीच्या रुग्णांचा शोध घेतला आहे.

.......................................

Web Title: In Mumbai, the duration of carena doubling is 358 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.