लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्के झाले आहे, तर २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत मुंबईतील एकूण कोविडवाढीचा दर ०.३१ टक्के झाला आहे. आतापर्यंत मुंबईत कोरोनाच्या १९ लाख २४ हजार १११ चाचण्या झाल्या आहेत. शहर, उपनगरात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी बुधवारी २२२ दिवसांवर पोहोचला आहे.
मुंबईत दिवसभरात काेराेनाचे ८७७ रुग्ण आढळले असून २० रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ८२ हजार ८११ झाली असून, बळींचा आकडा १० हजार ८३९ झाला आहे. सध्या १३ हजार ६० सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
..................