मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ ३५६ दिवसांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:07 AM2020-12-22T04:07:47+5:302020-12-22T04:07:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत दिवसभरात काेराेनाचे ६९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण २ लाख ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत दिवसभरात काेराेनाचे ६९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण २ लाख ६७ हजार ७०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ३५६ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या ७,७५४ सक्रिय रुग्ण आहेत.
दिवसभरात काेराेनाच्या ४६३ रुग्णांचे निदान झाले, तर १२ मृत्यूंची नोंद झाली. एकूण २ लाख ८७ हजार ३१३ कोरोनाबाधित असून, मृतांची संख्या ११ हजार ८ आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनाच्या २२ लाख २ हजार ५३६ चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत शहर, उपनगरात चाळ व झोपडपट्टीच्या वस्तीत सक्रिय कंटेन्मेंट झोन्सची संख्या २६३ आहे, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ३ हजार १०९ आहे. मागील २४ तासांत पालिकेने १ हजार ९६१ अतिजोखमीच्या व्यक्तींचा शोध घेतला आहे.
................