Join us

मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ ३९२ दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत शनिवारी ७०० रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत दोन लाख ८३ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत शनिवारी ७०० रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत दोन लाख ८३ हजार १३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर ९३ टक्क्यांवर पोहोचला आहे, तर रुग्ण दुपटीचा काळ ३९२ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या सहा हजार ९६५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत २५ लाख ८२ हजार २४८ चाचण्या झाल्या आहेत. शनिवारी दिवसभरात ५७१ रुग्ण आणि आठ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, बाधितांची एकूण संख्या तीन लाख दोन हजार २२३ झाली असून, मृतांचा आकडा ११ हजार २३५ झाला आहे.

मुंबईत चाळ व झोपडपट्टीच्या वस्तीत सक्रिय कंटेन्मेंट झोन्सची संख्या १३३ असून, २ हजार ३६५ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मागील २४ तासांत पालिकेने ३ हजार २४९ अतिजोखमीच्या रुग्णांचा शोध घेतला आहे.

................