मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ ४०९ दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:08 AM2021-01-19T04:08:31+5:302021-01-19T04:08:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. साेमवारी दिवसभरात ४८१ रुग्ण बरे ...

In Mumbai, the duration of patient doubling is 409 days | मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ ४०९ दिवसांवर

मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ ४०९ दिवसांवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. साेमवारी दिवसभरात ४८१ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण २ लाख ८४ हजार ३३१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ६,६७६ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण दुपटीचा काळ ४०९ दिवसांवर पोहोचला आहे.

सोमवारी ३९५ रुग्ण आणि ७ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, बाधितांची एकूण संख्या ३ लाख ३ हजार १४८ झाला, तर मृत्यूंचा आकडा ११ हजार २४९ झाला आहे. मुंबईत मागील २४ तासांत पालिकेच्या आरोग्य विभागाने १ हजार ९१३ अतिजोखमीचे आजार असणाऱ्या सहवासितांचा शोध घेतला. मुंबईत झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात सक्रिय कंटेन्मेंट झोन्सची संख्या १३३ इतकी आहे, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या २ हजार २४८ आहे. आतापर्यंत कोरोनाच्या २६ लाख ८ हजार ९३० चाचण्या झाल्या आहेत.

......................

Web Title: In Mumbai, the duration of patient doubling is 409 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.