मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ ५०० दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:06 AM2021-06-04T04:06:28+5:302021-06-04T04:06:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई- मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बाधितांची संख्या अधिक आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची आणि बाधितांची संख्या ...

In Mumbai, the duration of patient doubling is 500 days | मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ ५०० दिवसांवर

मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ ५०० दिवसांवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई- मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बाधितांची संख्या अधिक आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची आणि बाधितांची संख्या जवळपास सारखी आहे. मुंबईत गुरुवारी ९६१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे, तर केवळ ८९७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. काल हीच संख्या १ हजारांच्या वर होती.

मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९५ टक्के आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५०० दिवसांवर पोहोचला आहे. २७ मे ते २ जूनपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.१३ टक्के आहे. मुंबईतील चाळ व झोपडपट्टीच्या परिसरात ३३ सक्रिय कंटेन्टमेंट झोन आहेत, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या १४५ इतकी आहे.

मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजार ६१२ इतकी झाली आहे. मुंबईत आजही सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील सक्रिय रुग्णांमध्ये होणारी घट पाहता मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या बाधितांची संख्या ७ लाख ८ हजार ९६८ इतकी झाली आहे, तर मुंबईत आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या १४ हजार ९६५ इतकी आहे. मुंबईत गुरुवारी २७ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. कालच्या तुलनेत दिवसभरात मृतांची संख्या कमी आहे. मुंबईतील मृत्यूदरही हळूहळू आटोक्यात येऊ लागला आहे.

Web Title: In Mumbai, the duration of patient doubling is 500 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.